The Dirty Picture Sequel : 'द डर्टी पिक्चर'चा दुसरा भाग येणार? कोण साकारणार 'सिल्क'ची भूमिका, दिग्दर्शकानं काय दिलं उत्तर?

'त्या' दोन्ही अभिनेत्रींपैकी कोणती अभिनेत्री दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यावर दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
The Dirty Picture 2 Vidya Balan movie Director
The Dirty Picture 2 Vidya Balan movie Directoresakal

The Dirty Picture 2 Vidya Balan movie Director : सिल्क स्मिता कोण हे तसं काही चित्रपट रसिकांना माहिती होतं. पण जेव्हा एकता कपूरची निर्मिती असलेला आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित द डर्टी पिक्चर प्रदर्शित झाला तेव्हा मात्र साऱ्या देशाला सिल्क स्मिता कोण होती हे कळालं होतं. तिचा जीवनप्रवास किती भयाण होता हे त्या चित्रपटातून प्रभावीपणे समोर आले होते.

२०११ मध्ये आलेल्या द डर्टी पिक्चरनं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. त्यात विद्या बालन, तुषार कपूर आणि नसिरुद्दीन शहा यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. विद्याला त्या भूमिकेसाठी वेगवेगळ्या पुरस्कारानं गौरविण्यात देखील आले होते. आता तर विद्याच्या जागी बॉलीवूडची दुसरी अभिनेत्री भूमिका करणार असल्याचे बोलले जात आहे. त्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली आहे.

Also Read - लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्या बालनची जागा आता क्रिती सेनॉन किंवा तापसी पन्नू घेणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींपैकी कोणती अभिनेत्री दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यावर दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यात त्यांनी सध्या तरी त्यावर आपण चित्रपट तयार करण्याचा विचार करत नसल्याचे म्हटले आहे.

२०११ साली सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणून द डर्टी पिक्चरचे नाव घ्यावे लागेल. त्यानं बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली होती. इंडिया टु़डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये लुथरिया यांनी त्याचा सिक्वेल येणार का याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावरुन चर्चांना सुरुवात झाली होती. त्याचे उत्तर चाहत्यांना, प्रेक्षकांना मिळाले आहे.

The Dirty Picture 2 Vidya Balan movie Director
Kangana Ranaut - Pm Modi: 'तेजस'मधल्या डायलॉगचं क्रेडीट मोदींना देणार? कंगना म्हणाली...

काही दिवसांपासून विद्याच्या द डर्टी पिक्चरचा दुसरा भाग येणार अशी चर्चा रंगली होती. त्यात कोणती अभिनेत्री दिसणार याविषयी देखील बोलले जात होते. मला त्या चित्रपटातून जे काही सांगायचे होते ते मी सांगितले आहे. त्यामुळे अजून काही राहिलेलं नाही. लोकांनी त्याचे कौतुक केले.त्याला चांगला प्रतिसादही दिला होता. त्याचे समाधान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com