Oscars 2023 Wins: भारताच्या दोन महिला ज्यांनी ऑस्कर गाजवलं! The elephant whisperersच्या आहेत तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscars 2023 Wins 
The elephant whisperers

Oscars 2023 Wins: भारताच्या दोन महिला ज्यांनी ऑस्कर गाजवलं! The elephant whisperersच्या आहेत तरी कोण?

यंदाचा ऑस्कर सोहळा भारतासाठी खुप खास ठरला. यावेळी भारताने ऑस्करमध्ये बाजी मारत दोन पुरस्कार आपल्या नावे केले. भारताला यावर्षी तीन चित्रपटांकडून अपेक्षा होत्या.

ऑल दॅट ब्रीदस सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कॅटेगरीत ऑस्कर जिंकू शकला नाही.

मात्र द एलिफंट व्हिस्पर्स या चित्रपटाने बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्ड जिंकला आणि भारतात एकच जल्लोष झाला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक गोन्साल्विस यांनी केले होते तर गुनीत मोंगा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

गुनीत मोंगा :

गुनीत मोंगा हा एक भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत आणि त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याच्या चित्रपटांना आधीही जगभरात नावलौकिक मिळाला आहे. त्यांनी यापुर्वीही इतिहास रचला आहे.

पण 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाने मिळवलेले यश हे अत्यंत मौल्यवान आहे. या चित्रपटाने देशाला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला आहे.

गुनीत मोंगा यांनी याआधी दासवेदियां, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, गँग्स ऑफ वासेपूर, शाहिद, द लंच बॉक्स, मिकी व्हायरस, मान्सून शूटआउट आणि हरामखोर यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

यातील अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाले आहेत. 'मसान','गर्ल इन द येलो बूट्स','जल्लीकट्टू','पिरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स पगलेट' या ऑफबीट सिनेमांना करण्यात मोंगा यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

कार्तिकी गोन्साल्विस:

त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले आहे. कलाविश्वात त्याचं एक नवीन नाव आहे, पण आता त्यांनी हे देशाचं नाव जगभर अभिमानाने उंचावलं आहे.

प्राण्यांबद्दलची त्यांची आपुलकी आणि संवेदनशीलता त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून मांडली तेव्हा जगाला त्यांच्या प्रतिभेची ओळख करून दिली.

दिग्दर्शकाने द एलिफंट व्हिस्पर्स या लघुपटाचे दिग्दर्शन केले आणि देशाला पहिला ऑस्कर मिळवून दिला.

41 मिनिटांचा हा लघुपटात हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. The Elephant Whisperers ८ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती आणि आता ओटीटीच्या माध्यमातून आपण ''नेटफ्लिक्सवर' ती कधीही पाहू शकतात.

टॅग्स :Oscar AwardOscars