Karisma Kapoor: अखेर करिश्मा कपूरने एवढा मोठा ब्रेक का घेतला, स्वत:च केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karisma kapoor

Karisma Kapoor: अखेर करिश्मा कपूरने एवढा मोठा ब्रेक का घेतला, स्वत:च केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. मर्डर मुबारक हा चित्रपट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जे बऱ्याच काळापासून हेडलाइन बनत आहे.

अशा परिस्थितीत अभिनेत्रीने तिच्या लॉन्ग ब्रेकबद्दल अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, तिने असेही सांगितले आहे की, तिला 'कमबॅक' सारखे लेबल अजिबात आवडत नाही.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना करिश्मा कपूर म्हणाली, 'खरं सांगायचं तर ही माझी चॉइस होती. माझी मुलं लहान होती.. मला घरी राहायचं होतं. मी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. मी शाळेनंतर काम करायला सुरुवात केली. मी अनेक वर्षांपासून दिवसातून चार शिफ्ट किंवा दिवसातून तीन शिफ्ट्समध्ये काम केले आहे.'

मी दरवर्षी 8 ते 10 चित्रपट प्रदर्शित करायचे. मी खूप काम केले होते आणि मला असे वाटते की यामुळे मी खूप थकले होते आणि नंतर मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला कारण मला 100 दिवसांच्या लांब आऊटडोअर शूट शेड्यूलसाठी जायचे नव्हते. त्याऐवजी मी सोपा मार्ग निवडला.

पुढे, अभिनेत्रीने सांगितले की तिला 'कमबॅक' टॅग अजिबात आवडत नाही. ती म्हणाली, 'तुम्ही मला सांगा काही वर्षांनी जेव्हा कोणी ऑफिसवर परत येतो, तेव्हा तो कॉर्पोरेट जगतात पुनरागमन करतोय की नाही?' कलाकारांच्या बाबतीतही असंच व्हायला हवं असं मला वाटतं. पुरुष असो वा स्त्री, पण त्याचा वापर विशेषतः महिलांसाठी केला जातो.

अभिनेत्रीने 2012 मध्ये 'डेंजरस इश्क'मधून पुनरागमन केले. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. या सिनेमानंतर अभिनेत्री 'मर्डर मुबारक'मध्ये दिसणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे, ज्यासाठी करिश्माने शूटिंग सुरू केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सारा अली खान आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत.