esakal | 'आतापर्यतची सर्वात आव्हानात्मक भूमिका 'रे' चित्रपटात'
sakal

बोलून बातमी शोधा

ray movie

'आतापर्यतची सर्वात आव्हानात्मक भूमिका 'रे' चित्रपटात'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - द फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर अभिनेता मनोज वाजपेयी (actor manoj bajpayee) एका चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या रे नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचा प्रदर्शित झाला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्यात मनोज वाजपेयीची जी भूमिका आहे त्यानं त्याबदद्ल प्रतिक्रिया दिली आहे. आपण यात साकारलेली भूमिका आतापर्यतच्या भूमिकेपेक्षाही वेगळी असल्याचं त्यानं सांगितलं आहे. भारतातील प्रसिध्द दिग्दर्शक सत्यजित रे (satyajeet ray) यांच्या एका कलाकृतीवर आधारित हा चित्रपट आहे. (the family man 2 manoj bajpayee speaks about netflix anthology series ray for the first time)

रे (ray) या चित्रपटात मनोज वाजपेयी याच्याशिवाय के के मेनन (kay kay menon), अली फजल (ali faizal) यांच्याही त्यात प्रमुख भूमिका आहेत. एका आगळ्या वेगळया कथानकावर हा चित्रपट आधारलेला आहे. त्याच्या ट्रेलरमधून कल्पकता आणि त्या कथेचे वेगळेपण दिसून येते. या चित्रपटाच्या वेगळेपणाविषयी मनोज वाजपेयीनं एका दैनिकाला मुलाखत दिलीय. त्यात त्यानं रे च्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. तो म्हणतो, आतापर्यत ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापैकी सर्वात वेगळ्या प्रकारची भूमिका रे च्या निमित्तानं करायला मिळाली आहे.

रे मध्ये काम करणे हे एका नाटकाच्या कार्यशाळेमध्ये काम करण्यासारखे होते. त्या प्रवासादरम्यान खूप काही शिकायला मिळाले आहे. त्याचा आनंद आणि समाधान आहे. नेटफ्लिक्सवर प्रसिध्द होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे. मला निर्माते आणि दिग्दर्शकांच्या अशा सुचना आहेत की, या चित्रपटाबदद्ल बोलणं बरोबर नाही. अजून त्याच्या प्रॉड़क्शनचे काम सुरु आहे. जेव्हा तो प्रसिध्दीसाठी तयार होईल तेव्हा सविस्तरपणे त्यावर बोलता येईल.

हेही वाचा: सुशांतच्या आयुष्यावरील चित्रपटाला स्थगिती नाही, कोर्टाने फेटाळली याचिका

हेही वाचा: मिलिंदसोबत फॅमिली प्लॅनिंग कधी करणार? अंकिताच्या उत्तराने वेधलं लक्ष

रे हा चित्रपट सत्यजित रे यांच्या एका कथेवर आधारित आहे. त्याचे दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक अभिजीत चौबे यांनी केले आहे. त्यांनी आणि त्यांच्या एका सहका-यानं रे यांच्या कथेचा अनुवाद केला आहे. या चित्रपटातील माझ्या वाट्याला आलेली भूमिका मोठी कष्टप्रद म्हणावी लागेल. एका सीनसाठी सात ते आठ तासांचा वेळ या चित्रपटानं घेतला आहे.