THE FAMILY MAN 2 : शेवटपर्यंत उत्कंठा वाढवण्यात यशस्वी

कुटुंबासोबत नक्की एकदा पाहण्यासारखी वेबसीरिज
THE FAMILY MAN 2 : शेवटपर्यंत उत्कंठा वाढवण्यात यशस्वी
Image Source : TWITTER/@OTTGURUJINITHIN,@CBEPRASHANTH

फॅमिली मॅनच्या पहिली सीझनचा शेवट उत्कंठावर्धक वळणावर झाला होता. त्यामुळे फॅमिली मॅनचा दुसरा सीझन कसा असेल?. त्यात काय नावीन्य असेल? पहिल्या भागातील काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तर दुसऱ्या भागात मिळतील का? या बद्दल प्रेक्षकांना बरीच उत्सुक्ता होती. मागच्या काही महिन्यांपासून या सीरिजची बरीच चर्चा सुरु होती. अखेर शुक्रवारी ४ जूनला फॅमिली मॅनचा दुसरा सीझन अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला. अपेक्षेप्रमाणे दुसरा सीझनही रंगतदार ठरला आहे. दिग्दर्शक राज नीदीमोरु आणि कृष्णा डी.के. यांच्या जोडीनेही प्रेक्षकांना कुठेही निराश केलेले नाही. (The Family Man 2 review blockbuster performance by manoj bajpayee & samantha akkineni Amazon prime webseries)

कथानकाची जबरदस्त मांडणी

पहिल्या भागापासून ते शेवटच्या नवव्या एपिसोडपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक जोडी यशस्वी ठरली आहे. फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनमध्ये रहस्य काहीच नाहीय, पुढे काय घडणार हे प्रेक्षकांना ठाऊक आहे. पण कथानकाची मांडणी अशा पद्धतीने केलीय की, प्रेक्षक त्यामध्ये गुंतून राहतो. पहिल्या सीझनमध्ये भारतात घातपात घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI ने कट रचल्याचं दाखवलं आहे. दुसऱ्या सीझनमध्ये श्रीलंकन तामिळ बंडखोर आणि ISI ची हातमिळवणी दाखवली आहे. भारताचा या दोन्ही शेजारी देशांबरोबरचा जो इतिहास आहे, त्याचा दिग्दर्शकाने कथानकासाठी खुबीने वापर केलाय.

ISI आपला डाव साधते आणि...

पीएम बसूची भूमिका साकारणारी सीम बिस्वास आणि श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांमध्ये एका संवादातून या कथानकाला सुरुवात होते. श्रीलंकेतील एक बंदर चीनच्या ताब्यात जाऊ नये, अन्यथा रणनितीक दृष्टीने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे बसू यांचे म्हणणे असते. हे बंदर चीनला मिळू नये, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्याबदल्यात श्रीलंकेकडून चेन्नईमध्ये असलेल्या तामिळ बंडखोर सुब्बुची मागणी केली जाते, जो विजनवासात असलेल्या सरकारचा प्रमुख भास्करनचा लहान भाऊ आहे. सुब्बु भारताच्या ताब्यात असताना ISI आपला डाव साधते आणि तिथून खऱ्या अर्थाने मग फॅमिली मॅन दोनचा कथानक आकाराला येतं.

कुटुंबवत्सल ते एजंट श्रीकांत

पहिल्या सीझनमध्ये एजंट असलेला श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयी दुसऱ्या सीझनमझध्ये कॉर्पोरेटमधला नोकरदार दाखवला आहे. मनोज वाजपेयीच्या भूमिकेला दोन छटा आहेत. एक बाप, पती म्हणून कुटुंबाला बांधून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मुलांना, पत्नीला तो जास्त वेळ देत असतो. पण एकावळणावर पुन्हा त्याचा प्रवास टास्कच्या दिशेने सुरु होतो. तो त्याच्या मूळ एजंटच्या भूमिकेत शिरतो. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शत्रुच्या शोधात तो निघतो. फॅमिली मॅन आणि एजंट श्रीकांत या दोन्ही भूमिकांना मनोज वाजपेयीने पूर्णपणे न्याय दिला आहे. कुठेही त्याने प्रेक्षकांना निराश केलेले नाही.

अस्वस्थ तामिळ बंडखोर उभी करणारी समंथा

दुसऱ्या बाजूला राजीच्या भूमिकेत असलेली समंथा अक्किनेनी सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. डिजिटलमध्ये पदार्पण करणाऱ्या समंथाने अप्रतिम राजी साकारली आहे. तिच्या वाट्याला फारसे डायलॉग नाहीयत. डोळे आणि चेहऱ्यावरच्या भाव, यामधूनच राजी जिवंत करण्याचं आव्हान तिच्यासमोर होतं. यामध्ये समंथा पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. तिने तिचे डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव यामधून एक अस्वस्थ तामिळ बंडखोर उभी केली आहे. यामध्ये समंथाने अनेक अ‍ॅक्शन सीन्स लीलया साकारले आहेत. समंथाने काही बोल्ड सीन्सही दिले आहेत. पण ती कथानकाची गरज आहे, हे लक्षात येतं. हे बोल्ड सीन्स पाहताना वास्तवात समाजात असलेल्या अपप्रवृत्ती कशाप्रकारची आहे, कसा विचार करते, ते दिसते.

सुचीच्या मनात अपराधीपणाची भावना

मनोज वाजपेयी, समंथाप्रमाणे प्रियामणीने सुद्धा सुची उत्तमरित्या साकारली आहे. पती श्रीकांत सुचीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सुचीला हे कळतय पण ती संसारात समाधानी नाहीय. आतमधून तिला काही गोष्टी खटकतायत. तिच्यामनात एक अपराधीपणाची भावना आहे. मुलं, संसार संभाळताना नवरा-बायकोमध्ये विसंवादातून निर्माण होणारा दुरावा, मित्र अरविंद बरोबरचं तिचं नातं हे दिग्दर्शकाने उत्तमरित्या मांडलं आहे.

THE FAMILY MAN 2 : शेवटपर्यंत उत्कंठा वाढवण्यात यशस्वी
"काय नाटक आहे.. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्..."

ध्रीती अश्लेषा ठाकूरही लक्षात राहते

मनोज वाजपेयीच्या मुलीची भूमिका साकारणारी ध्रीती अश्लेषा ठाकूरही लक्षात राहते. शाळेत जाणाऱ्या ध्रीतीचे कल्याण म्हणजेच अभय वर्मा बरोबर प्रेमप्रकरण सुरु असते. एका १५-१६ वर्षाच्या मुलीमध्ये जी समज असायल हवी, ती समज तिच्यात असते. प्रसंगी आई-वडिलांविरोधात जाण्याची धमकही तिच्यात आहे. ध्रीतीच्या या प्रेमप्रकरणामुळे वडिल महत्त्वाच्या मिशनवर असताना कसे अडचणीत येतात? त्यानंतर एक टप्प्यावर आक्रमक झालेली ध्रीती कशाप्रकारे आपल्या प्रियकराला संपवते, त्यासाठी ही वेबसीरिज नक्कीच पाहावी लागेल.

THE FAMILY MAN 2 : शेवटपर्यंत उत्कंठा वाढवण्यात यशस्वी
मुलींना फसवणारा स्वत:च्याच जाळ्यात अडकला; पोलिसांनी केली अटक

का पाहावा फॅमिली मॅन २

कथानकाची उत्तम मांडणी, कलाकारांची योग्य निवड आणि अभिनय यामुळे फॅमिली मॅन २ पहिल्या सीझनप्रमाणेच रंगतदार झाला आहे. काही प्रेक्षकांना दुसऱ्यापेक्षा पहिला सीझन जास्त आवडू शकतो. पण दोन्ही सीझनचे कथानक वेगवेगळे आहेत. मला तर फॅमिली मॅनचे दोन्ही सीझन आवडले. अ‍ॅमेझॉन प्राईमवर मिर्झापूर २ रिलीज झाला, त्यावेळी बऱ्याच अपेक्षा होत्या. पण मिर्झापूरचा दुसरा सीझन तितका भावला नाही. दिग्दर्शकाला कथानकावर पकड ठेवता आली नाही. त्यामुळे मिर्झापूरचा दुसरा सीझन भरकटला. पण फॅमिली मॅनच्या बाबतीत असे झालेले नाही. काही अपवाद सोडले, तर कथानकाच्या उत्तम मांडणीमुळे शेवटपर्यंत उत्कंठा टिकून राहते.

या आहेत चुका

अपवाद फक्त काही प्रसंगाचा आहे. सुब्बुला पकडण्यासाठी जेव्हा स्पेशल एजंटस जातात. त्यावेळी सुब्बु त्यांच्यापैकी निम्म्या एजंटसना संपवतो. त्यानंतर नायक मनोज वाजपेयीचा दोन-तीनवेळा तामिळ बंडखोरांशी थेट सामना होता. यावेळी आमने-सामनेच्या गोळीबारामध्ये इतरांना गोळया लागतात पण नायकाला काही होत नाही आणि स्फोटकांनी भरलेल्या विमानाने हल्ला होणार हे माहित असूनही इंडियन एअर फोर्सला अलर्ट केले जात नाही. अशा टिपिकल हिंदी सिनेमाला साजेशा काही खटकणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास फॅमिली मॅनचा दुसरा सीजन रंजक झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com