esakal | फॅमिली मॅनचा तिसरा सिझन कधी? चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्याचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

the family man season 2

फॅमिली मॅनचा तिसरा सिझन कधी? चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्याचं उत्तर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - द फॅमिली मॅनच्या (the family man season 2) दुस-या सिझनची क्रेझ अद्याप कायम आहे. गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक या मालिकेच्या दुस-या सिझनची वाट पाहत होते. तो मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले. आता प्रेक्षकांना मालिकेचा तिसरा सिझन कधी येणार असा प्रश्न दिग्दर्शक आणि निर्माते यांना विचारला आहे. त्यावरुन सध्या सोशल मीडियावर फॅमिली मॅन हा विषय ट्रेडिंगचा (trending news) असल्याचे दिसून आले आहे. (the family man actor darshan kumar answer to fan third season of web serise )

सोशल मीडियावर (social media) या मालिकेतील कलाकार दर्शन कुमार याला या मालिकेचा तिसरा सिझन (about third season) कधी येणार असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यानं मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आता कुठे सिझन प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी थोडा धीर धरावा. तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर एका चाहत्यानं त्याला यावर्षी की पुढच्या वर्षी असा प्रश्न विचारला. त्यावर दर्शन कुमारनं त्याला उत्तर दिलं आहे.

the family man season 2

the family man season 2

the family man season 2

the family man season 2

प्रेक्षकांना अदयाप काही प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांनी ते प्रश्न सोशल मीडियावर पोस्ट करताना ते त्या मालिकेच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनाही टॅग केले आहेत. वास्तविक या मालिकेचे दिग्दर्शक राज डीके यांनी कदाचित पुढील वर्षी या मालिकेचा तिसरा भाग प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे दर्शन कुमारनं देखील या मालिकेचा तिसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: 'बहुत बुरा लगता है'; मनोज वाजपेयीने सांगितला पत्रकारांसोबतचा अनुभव

हेही वाचा: मराठी अभिनेत्रीचं हटके फोटोशूट; न्यूजपेपर ड्रेस, कमोडवरील पोझमुळे चर्चेत

एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक राज डीके म्हणाले होते, तिसऱ्या सिझनमध्ये कोरोना महामारीवर आधारित कथानक नक्कीच असेल, पण ते किती प्रमाणात दाखवता येणार हे आताच काही सांगता येणार नाही.