Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डेंनी पत्नी प्रिया बेर्डेला दिलेलं पहिलं गिफ्ट माहितीय? व्हिडिओ होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

the first gift given Laxmikant Berde to her wife Priya Berde video viral

Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डेंनी पत्नी प्रिया बेर्डेला दिलेलं पहिलं गिफ्ट माहितीय? व्हिडिओ होतोय व्हायरल

Laxmikant Berde death anniversary : मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणारा एक नट म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. मनोरंजन विश्वातल्या एका अढळताऱ्याने लवकर एक्झिट घेतली. पण त्यांच्या स्मृति आजही आपल्या मनात आहेत. आजही त्यांचे चित्रपट, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांची पत्नी प्रिया बर्डे यांचे नाते अवघ्या जगाला माहीत आहे. त्यांचे प्रेम मग लग्न आणि संसार असे नाते बहरत गेले. लक्ष्मीकांत यांना लवकर देवज्ञा झाली तरी त्त्यांच्या जोडीचा आजही आवर्जून उल्लेख केला जातो.

पण तुम्हाला माहीत आहे का, की लक्ष्मीकांत यांनी प्रिया बेर्डे यांना दिलेली पहिली भेटवस्तू काय होती? नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमधून ही खास बात उघड झाली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा एक दुर्मिळ व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 'जोडी नं १' या कार्यक्रमातील असून या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रेशम टिपणीस सूत्रसंचालन करताना दिसत आते. तर लक्ष्मीकांत आणि प्रिया हे जोडीने या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे.

या कार्यक्रमात रेशम टिपणी लक्ष्मीकांत यांना विचारते की, 'तुम्ही प्रियाला दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं? यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात, मी तिला खूप गिफ्ट दिले आहेत. तर यावर रेशम म्हणते, असं नाही पहिलं कोणतं होतं ते सांगा.... यावर लक्ष्मीकांत म्हणतात, 'मी प्रियाला पहिलं गिफ्ट म्हणून साडी दिली होती'. त्यावर प्रिया म्हणतात, हो हे बरोबर आहे. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची ही दुर्मिळ मुलाखत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण कधीच विसरु शकत नाही. ‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘अफलातून’ असे त्यांचे कित्येक चित्रपट आजही तितक्याच आवडीने पाहिले जातात. सध्या त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे हे देखील मनोरंजन विश्वात जोरदार कामगिरी करत आहेत.

टॅग्स :laxmikant berde