
Jhalak Dikhla Jaa 10- Ali Asgar: कपिल शर्मा शो मध्ये 'दादी' ही व्यक्तिरेखा साकारुन अभिनेता अली अजगरनं आपला असा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गेल्या एक दशकापासून अली वेगवेगळ्या कॉमेडी व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. 'झलक दिखला जा १०' मध्ये देखील अली अजगर आपल्या नृ्त्याच्या अदाकारीनं चाहत्यांचे मनोरंजन करताना गेल्या काही दिवसांपासून दिसत होता. पण अजूनही लोकांच्या लख्ख लक्षात आहे ते अलीनं साकारलेली 'दादी' ही व्यक्तिरेखा. पण या गोष्टीनं दस्तुरखुद्द अलीच्या मुलाला मात्र खूप त्रास दिला आहे. 'झलक..' मधून आऊट झाल्यावर अलीनं भावूक होत त्याचं एक दुःख सर्वांसोबत शेअर केलं आहे. अली अजगरच्या दादी व्यक्तीरेखेमुळे त्याच्या मुलाला ट्रोल केलं जात होतं हा मोठा खुलासा अभिनेत्यानं केला आहे.(The Kapil Sharma Show ali asgar son mocked in school)
' झलक दिखला जा १०' मधून अली बाहेर पडणारा पहिला स्पर्धक आहे. शो मधून आऊट झाल्यावर अलीनं मीडियासोबत संवाद साधला. आणि आपले काही भावूक क्षण मीडियासोबत शेअर केले. अली म्हणाला,''कॉमेडी शो मध्ये मी साकारलेल्या स्त्री पात्रांमुळे माझ्या मुलाला खूप सहन करावं लागलं आहे. माझ्या मुलाला शाळेत सगळे चिडवायचे. आणि मग त्यामुळे मी देखील दादी ही व्यक्तिरेखा साकारावी की नाही याबाबतीत संभ्रमात पडलो. माझी मुलं ४ थी आणि ५ वी इयत्तेत त्यावेळी होती,जेव्हा त्यांना माझ्यामुळे ट्रोल केलं जायचं''.
अली पुढे म्हणाला,''मी एकदा बसंती ही व्यक्तिरेखा साकारली होती. तेव्हा माझ्या मुलाला म्हटलं होतं- 'अरे याचा बाप बसंती आहे,याला दोन-दान आई आहेत'. एकदा शनिवारचा दिवस होता,आम्ही सगळे एकत्र डिनर करत होतो. आणि टी.व्हीवर माझ्या एका शो ची अनाउंसमेंट झाली की मी पुन्हा एका स्त्री पात्रात भेटायला येणार आहे. ते ऐकून माझा मुलगा ताडकन उभा राहिला. आणि म्हणाला की,'तुम्हाला आणखी काही करता येत नाही का?' बिचारा तो लहान मुलगा मला विचारत होता की, बाबा,तुम्हाला दुसरं काही करता येता नाही का? मग त्यानंतर त्याने मला शाळेत माझ्यावरुन त्याला ट्रोल केलं जातं याविषयी सांगितलं. मी फक्त स्त्री पात्रच रंगवतो यावरनं त्याला हिणवलं जातं असं देखील तो म्हणाला''.
अली म्हणाला, ''मुलाच्या बोलण्याकडे मी त्यादिवशी दुर्लक्ष केलं,पण एकदा रविवारच्या दिवशी, मी पुन्हा स्त्री पेहरावात दिसलो. माझा मुलगा काही बोलला नाही पण जेवता-जेवता उठला आणि निघून गेला. मग मी निर्णय घेतला की आता मी स्त्री व्यक्तिरेखा साकारणार नाही यापुढे. आणि जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा विश्वास ठेवा माझ्याकडे काहीच काम नव्हतं''.
''मी ९ महिने प्रत्येक प्रोजेक्टला नाही म्हणत आलो. कारण मला फक्त स्त्री व्यक्तिरेखा ऑफर केल्या जायच्या, मी एक अभिनेता आहे. मी फीमेल पात्र रंगवतो आणि मी इतरही अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण जेव्हा मी कॉमेडीच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवलं ,तेव्हा मला स्त्री पात्रच ऑफर केली गेली. मला त्यावरनं ट्रोलही केलं गेलं. माझ्याविषयी खूप उलट-सुलट लिहिलं गेलं. नामर्द आहे,बेशरम आहे..काय काय म्हणायचे लोक. मी नेहमी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं''.
अलीनं सांगितलं की,'' 'झलक..' सारखा वेगळा शो करुन छान वाटलं. मी मिस करीन हा मंच. हा प्लॅटफॉर्म कोणाच्या कामाची निंदा करत नाही तर फक्त बेस्ट काम तुमच्याकडून काढून घेतो. मी माझ्या नेहमीच्या कामांपेक्षा खूप वेगळं काम केल्याचा आनंद 'झलक दिखला जा' या शो मधून मिळवला''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.