अनुपम खेर यांच्या घरी निमंत्रणाशिवाय पोहोचले पंडित अन् पूजेचा घातला घाट Anupam Kher | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

People performing puja for Anupam Kher at his residence.

अनुपम खेर यांच्या घरी निमंत्रणाशिवाय पोहोचले पंडित अन् पूजेचा घातला घाट

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files)मुळे अनुपम खेर(Anupam Kher) सध्या भलतेच चर्चेत आहेत. भारतात बॉक्सऑफिसवर सिनेमानं २३६ करोडचा गल्ला कमावला आहे. पण त्यानंतर मात्र त्यांच्या घरी रोज तीन-चार दिवस दोन पुजारी येतायत आणि अनुपम खेर यांनी न बोलावत,न सांगता येऊन त्यांच्यासाठी पूजा-अर्चना करतायत. अनुपम खेर यांनी नुकतंच याविषयी सांगितलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी पुरावा म्हणून चक्क त्या पूजेचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. घरातील त्या पूजेचा व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिलं आहे,''द काश्मिर फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून माझ्या घरी प्रत्येक आठवड्याच्या तिसऱ्या वा चौथ्यादिवशी पंडित म्हणजेच पुजारी येतात आणि माझ्यासाठी पूजा करतात. आणि याबदल्यात माझ्याकडनं काहीही नं घेता निघून जातात. मी मात्र धन्य झालो आहे. पुजेच्या त्या मंगलमय वातावरणात मला नेल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. हर हर महादेव! काहीही होऊ शकतं. आशीर्वादानं धन्य झालोय मी''.

अनुपम खेर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकत आहोत,दोन पुजारी श्लोक म्हणताना दिसत आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्याचा वर्षाव अनुपम खेर यांच्या डोक्यावरनं करीत आहेत. त्यावेळी त्यांच्या हातात गीतेचं पुस्तकही आहे. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या प्रेमात आणखी काय काय घडेल ते सांगता यायचं नाही. पण अनुपम खेर यांच्याबाबतीत जे घडतंय ते उत्तमच आहे की. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात दर्शन कुमार,मिथुन चक्रवर्ती,चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी,पल्लवी जोशी अशा कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. अनुपम यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करीत आपला सिनेमा त्यांना समर्पित करत असल्याचं म्हटलं होतं.

त्यांनी तो फोटो पोस्ट करीत लिहिलं होतं,''माझे वडिल पुष्करनाथजी यांच्यासोबतचा माझा हा शेवटचा फोटो. पृथ्वीवरचा साधा-सरळ,निर्मळ आत्मा असलेली व्यक्ती. त्यांच्या प्रेमळ स्वभावानं त्यांनी अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यांना काश्मिरला जायचं होतं,पण शक्य झालं नाही. त्यामुळे माझा सिनेमा 'द काश्मिर फाईल्स' मी त्यांना समर्पित करीत आहे''. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनचा आकडा सांगताना सिनेमानं २५० करोड पार केलेयत असं म्हटलं होतं. त्यांनी सिनेमाला ब्लॉकबस्टर म्हणूनही घोषित केलं आहे.

Web Title: The Kashmir Files Anupam Kher Says Priests Visit His House To Do Puja Leave Without Asking For Anything

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top