
The Kashmir Files:1975 नंतर पहिल्यांदाच घडलं; काय म्हणतायत Trade Analyst
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमानं बॉक्सऑफिसवर आपला दरारा निर्माण केलेलं चित्र सध्या दिसत आहे. प्रदर्शनाआधी सिनेमा विषयी तयार झालेलं चित्र आता अचानक पालटत आहे. सिनेमा प्रदर्शनाआधी पासून खरंतर वादांनी घेरला होता. सिनेमात काश्मिरी पंडितांविषयी जे सत्य मांडलं आहे त्यावरनं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना मिळालेली धमकी असो,की कपिल शर्मा शो मध्ये निमंत्रण न मिळाल्यानं उठलेला वाद असो,सिनेमा कोणत्या नं कोणत्या कारणानं चर्चेतून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. पण त्यानंतर दोन राजकीय गटात सिनेमातील कथानकावरुन जो वाद रंगलाय त्यामुळे सिनेमाला मात्र चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय.
हेही वाचा: शिल्पा शेट्टीच्या आईच्या अडचणीत वाढ;फसवणूक प्रकरणी कोर्टानं दिला निर्णय
११ मार्चला सिनेमा प्रदर्शित झाला त्यादिवशीच सिनेमागृहातून सिनेमा पाहून बाहेर येणारा प्रेक्षकवर्ग भावूक दिसला. काही महिला प्रेक्षक तर अक्षरशः रडताना दिसले. आता पाच दिवसांनी सिनेमानं स्वतःला १०० करोडच्या जवळ नेऊन ठेवलंय बरं का. सिनेमा प्रदर्शित झाला त्यादिवशीच सिनेमानं ३.५५ करोड कमावले होते. सोमवारी १४ मार्चपर्यंत सिनेमानं बॉक्सऑफिसवर १५ करोडचा बिझनेस केला होता. कालपर्यंत सिनेमानं बॉक्सऑफिस कलेक्शनवर वेग पकडत ६० करोड पर्यंत मजल मारल्याची बातमी आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून 'द काश्मिर फाईल्स' कडे पाहिलं जातंय. सिनेमाला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता या आठवड्यात 'द काश्मिर फाईल्स' १०० करोडच्या क्लब मध्ये जाऊन बसेल असं बोललं जात आहे. बॉक्सऑफिस इंडिया.कॉम च्या मते,''सिनेमाला जे बल्क म्हणजेच ग्रुप बुकिंग मिळत आहे त्यामुळे मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटर्सना फायदा होत आहे. सिनेमा दिवसाला २० करोड कमवेल अशी अपेक्षा आहे. प्रदर्शनाच्या आठवड्यापासून आतापर्यं सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता बॉक्सऑफिस कलेक्शनची कमाई आणखी वाढू शकते''.
हेही वाचा: The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय मांडलेकर नाराज
ट्रेड अॅनलिस्ट सुमित काडेल म्हणाले,''कमी बजेटमध्ये बनूनही 'द काश्मिर फाईल्स'ने जो इतिहास रचलाय तो खरंच कौतूकास्पद आहे. १९७५ मध्ये 'जय संतोषी मॉं' या सिनेमानं कमी बजेटमध्ये बनूनही भरघोस कमाई बॉक्सऑफिसवर केली होती. त्यानंतर आता 'द काश्मिर फाईल्स'नं ती कमाल करून दाखवली आहे. भारतभरात मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटर्सच्या मिळून तब्बल २५०० स्क्रीन्सवर 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा दाखवला जात आहे. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सिनेमाला पाठिंबा दर्शवला आहे. याचा सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर अधिक परिणाम होऊन सिनेमा कदाचित २००-२५० करोडही कमावू शकतो असे अंदाज वर्तवले जात आहेत.
Web Title: The Kashmir Files Box Office Collection Day 5 Anupam Kher Starrer Heading For The 100 Crore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..