The Kashsmir Files : कश्मिर फाईल्सला राष्ट्रीय पुरस्कार मिळताच ओमर अब्दुलांनी उडवली खिल्ली! 'हा चित्रपट म्हणजे....!'

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतान्वये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्कारानं गौरविण्यात आले.
Vivek Agnihotri big reply to Omar Abdullah as he scoffs at National Award
Vivek Agnihotri big reply to Omar Abdullah as he scoffs at National Award esakal

Vivek Agnihotri big reply to Omar Abdullah as he scoffs at National Award : ज्या चित्रपटानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते, जो चित्रपट बॉलीवूडमधील आजवरचा सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट म्हणून ओळखला गेला त्या द काश्मिर फाईल्सवरुन आता पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे. नुकतचं या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे दिसून आले.

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतान्वये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्कारानं गौरविण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. काश्मिर फाईल्सचा गौरव झाल्यानंतर काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दूला यांनी एक्सवरुन दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. अब्दुल्ला यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता खरी राष्ट्रीय एकता आली असे म्हणावे लागेल. असे म्हणताना त्यांनी एक हसण्याचा इमोजी देखील शेयर केला आहे. अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया समोर येताच विवेक अग्निहोत्री यांनी देखील अब्दुल्ला यांना उत्तर दिले आहे. अब्दुल्लाजी आपल्याकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया मिळणे ही देखील आमच्यासाठी खूपच महत्वाची गोष्ट आहे.

Vivek Agnihotri big reply to Omar Abdullah as he scoffs at National Award
Dream Girl 2 Review : 'ड्रीम गर्ल २' पाहणार तब्येत खूश होणार!, आयुषमान इतका बहुरंगी, बहुढंगी अभिनेता दुसरा कुणी नाहीच

तुम्ही यापेक्षा आणखी कोणती वेगळी टिप्पणी केली असती तर मला वाईट वाटले असते. पण तसे झाले नाही. याचा आनंद नाही. कश्मिर फाईल्सविषयी सांगायचे झाल्यास, प्रचंड वाद झाल्यानंतर देखील या चित्रपटानं मोठी कमाई केली होती. कश्मिर फाईल्सने प्रेक्षकांची पसंतीही मिळवली होती.त्यावरुन मोठा वादही झाला होता.

कश्मिरच्या खोऱ्यात ज्या हिंदू लोकांची हत्या झाली होती, आणि ज्यांनी कश्मिर कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला त्यांच्याविषयीची विदारक कहानी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न अग्निहोत्री यांनी केला होता. १९९० मध्ये कश्मिरच्या खोऱ्यात जे काही घडले ते अग्निहोत्री यांनी प्रभावीपणे या चित्रपटातून मांडले आहे.

काहींनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणून डिवचले. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वादही समोर आले. इतकेच नाही तर गोव्यामध्ये झालेल्या इफ्फी महोत्सवामध्ये एका आंतरराष्ट्रीय परिक्षकानं देखील या चित्रपटावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या चित्रपटातून फक्त द्वेष दिसून येतो. असे त्यानं म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com