The Kerala Story : 'वडिलांना माझी खूप भीती वाटू लागलीय!' केरळ स्टोरीच्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

देशभरातून या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना काही राज्यांमध्ये केरळ स्टोरीला बंदीचा फटका बसला आहे.
The Kerala Story
The Kerala Story

Actress Yogita Bihani Reveals Her father is scared : सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी हा सध्या गेल्या आठवड्यापासून खूपच चर्चेत आला आहे. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले. देशभरातून या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना काही राज्यांमध्ये केरळ स्टोरीला बंदीचा फटका बसला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं देखील राज्यांना स्पष्टपणे विचारणा करत नोटीस पाठवली आहे.

केरळ स्टोरीला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा सारख्या राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आले आहे. यासगळ्यात या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या योगिता बिहानी अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये केलेला खुलासा हा नेटकऱ्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी याच चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मानं देखील केरळ स्टोरीवरुन केलेले विधान चर्चेत आले होते. त्यानंतर योगिताच्या वक्तव्यानं तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी काळजी वाटू लागली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

केरळ स्टोरीला अनेकांनी प्रोपंगडा करणारा चित्रपट असे म्हटले आहे. त्यावरुन अदा शर्मानं नेटकऱ्यांना फटकारले होते. दिग्दर्शकानं देखील पूर्वी या चित्रपटाला जे नावं ठेवत होते तेच आता चित्रपट पाहिल्यानंतर कौतूक करत असल्याचे सांगितले. मात्र यासगळ्यात योगिताची प्रतिक्रिया धक्कादायक आहे. तिनं माझ्या वडिलांना माझ्याविषयी खूपच काळजी वाटू लागली आहे. चित्रपटावरुन जो वाद सुरु झाला आहे त्यामुळे त्यांची चिंता वाढताना दिसत आहे. असे म्हटले आहे.

The Kerala Story
Parineeti-Raghav Engagement : शेवटी साखरपुड्याचा दिवस उजाडला! डेटिंग संपलं

केरळ स्टोरीपूर्वी योगितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असून तिचा चाहतावर्गही मोठा आहे. मात्र केरळ स्टोरीनं तिला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितले की, आम्ही खूप प्रामाणिकपणे या चित्रपटामध्ये काम केले. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. तसा विचारही नाही. जे घडते आहे तेच चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काहींनी त्याचा वेगळा प्रचार केला आहे.

The Kerala Story
The Kerala Story SC : केरळ स्टोरी साऱ्या देशात सुरु, तुमच्याकडेच बंदी का? न्यायालयाची बंगाल, तामिळ सरकारला नोटीस!

आमच्यासाठी केरळ स्टोरी हा एखाद्या कॉलेज प्रोजेक्टसाठी होता. त्यामुळे आम्ही तो खूप समर्पित भावनेनं केला. पण आता त्यावरुन जो वाद होतो आहे याची जास्त काळजी वाटते आहे. वडिलांना माझी खूप काळजी वाटत आहे. मला अनेकदा वडिलांना काही काळजी करु नका. सगळे व्यवस्थित आहे. असे सांगावे लागत आहे. त्यांना जो वाद होतो आहे याची जास्त चिंता वाटत असल्याचे योगितानं सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com