The Kerala Story BO: द केरळ स्टोरीचं नॉट आउट द्विशतक पुर्ण! कमाईचा धडाका सुरुच

The Kerala Story Box Office Collection Day 18
The Kerala Story Box Office Collection Day 18Esakal

The Kerala Story Box Office Collection Day 18: 'द केरळ स्टोरी' या विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 5 मे ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही याची बरिच चर्चा रंगली. केवळ 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या कमाईचा आलेख हा दिवसेंदिवस उंचावतांना दिसत आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर थैमान घातले आहे. या चित्रपटाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना तोंडावर पाडले आहे. मग तो अक्षय कुमार अस किंवा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. या बिग स्टार्सना अदा शर्मा भारी पडल्याचं चित्र बॉक्स ऑफिसच्या आकड्यावरुन दिसत आहे.

The Kerala Story Box Office Collection Day 18
RRR Actor Death: 'आरआरआर' च्या खलनायकाचं निधन..

या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. ज्या क्षणाची निर्माते आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आलाच. 'द केरळ स्टोरी'ने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या 18 व्या चित्रपटाने दिवशी किती कोटींची कमाई केली हे जाणुन घेवुया.

वाद जितका जास्त तितकी कमाई देखील जास्तच होते असं म्हटलं जात आणि तसचं काहीस द केरळ स्टोरी बाबत घडलेलं दिसत आहे. इतक्या वादनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डबल सेंच्यूरी पुर्ण केली आहे.

The Kerala Story Box Office Collection Day 18
Tejaswini Pandit Birthday: घराची वीज गेली होती, त्यावेळी लाईट बिल भरण्यासाठी तेजस्विनीने केलं होतं हे काम

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'The Kerala Story' ने रिलीजच्या 18 व्या दिवशी 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई जरी कमी असली तरी यानंतर चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता 204.47 कोटी रुपये झालं आहे. यासोबतच चित्रपटाने तिसऱ्या सोमवारी 200 कोटींचा टप्पा पार पाडला आहे.

The Kerala Story Box Office Collection Day 18
CID Actor Death Update: 25 वर्षीय आदित्य सिंग राजपूतची शेवटची पोस्ट व्हायरल.. मित्रांसोबतची अखेरची भेट चर्चेत

याच बरोबर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार करणारा द केरळ स्टोरी हा 'पठाण' नंतरचा दुसरा हिंदी चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर 18 दिवस आणि वादानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आकर्षित करत आहे.

The Kerala Story Box Office Collection Day 18
Khupte Tithe Gupte: 'ए गप रे..' गुप्तेंच्या सिंहासनावर राज ठाकरे , पहा अजित पवारांवर कसा साधला निशाणा ?

केरळमधील 32,000 हिंदू महिलांना जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याच्या संशयास्पद दाव्यामुळे चित्रपटाची कथा वादात अडकली होती. पण तरीही ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत आणि चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे.

अदा शर्मा बरोबरच 'द केरळ स्टोरी' मध्ये योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी, विजय कृष्णा, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com