The Kerala Story : जे शिव्या देत होते तेच आता चित्रपट पाहिल्यावर करताहेत कौतूक! दिग्दर्शकाच्या डोळ्यात पाणी

सध्या दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या व्हायरल झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या चित्रपटाला नावं ठेवणाऱ्यांनी आता घेतलेल्या भूमिकेविषयी मोकळेपणानं सांगितले आहे.
The Kerala Story Director Sudipto Sen Controversy audience
The Kerala Story Director Sudipto Sen Controversy audience

The Kerala Story Director Sudipto Sen Controversy audience : द केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माते विपुल शहा यांच्यावर प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी जोरदार टीका सुरु केली होती. त्याचे कारण त्यांनी प्रोपगंडा चित्रपट तयार केला असे त्यांचे म्हणणे होते. यावेळी त्यांच्या बाजुनं उत्तर देण्यासाठी अभिनेते अनुमप खेर, कंगना रनौत, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी विरोधकांना जशास तसे उत्तर दिले आहे.

सध्या दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या व्हायरल झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या चित्रपटाला नावं ठेवणाऱ्यांनी आता घेतलेल्या भूमिकेविषयी मोकळेपणानं सांगितले आहे. दिग्दर्शकाचे म्हणणे आहे की, अनेकांनी केरळ स्टोरीचा चुकीचा प्रचार केल्यानं वेगळेच प्रश्न तयार झाले. हा चित्रपट कोणत्याही दोन गटांमध्ये द्वेष निर्माण करत नाही. सदयस्थितीला जे काही होते त्यावर भाष्य करणारा चित्रपट केरळ स्टोरीचा उल्लेख करता येईल. म्हणून तर काही राज्यांनी या चित्रपटाला टॅक्स फ्री केले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ज्यांना माझी भूमिका आवडली नाही त्यांनी विरोध केला आहे. मी त्यांच्या विरोधाचे स्वागत करतो. पण मला एक सांगायचे आहे की, तुम्ही विरोध करण्यापूर्वी एकदा चित्रपट पाहा. मग बोला. चित्रपट न पाहता केवळ ऐकीव माहितीवर बोलणे चुकीचे आहे. त्यातून चुकीचा मेसेज समाजात जातो. चित्रपटानं जी पन्नास कोटींची कमाई केली आहे ती हा चित्रपट करेल असा विश्वास होता. आता तर हा चित्रपट एक राष्ट्रीय मुद्दा झाला आहे. हे पाहून, ऐकून आनंद होतो.

एक दिग्दर्शक म्हणून मला ज्या गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्या. आता त्यांनी स्वता ठरवावे खरे खोटे काय आहे ते. मला खोटं सांगण्यात काही रस नाही. जे घडतं आहे ते मांडावे असा उद्देश होता. आणि लोकांना जर एवढं खोटं वाटत असतं तर त्याला एवढा प्रतिसाद मिळाला असता का असा माझा प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया सेन यांनी यावेळी दिली आहे.

The Kerala Story Director Sudipto Sen Controversy audience
'The Kerala Story च्या निर्मात्यांच्या नखालाही धक्का लागला तर, आव्हाड तुम्हाला नाक्यावर...!' नितेश राणेंचं आव्हाडांना उत्तर

मला एका गोष्टीचे विशेष वाटते ते म्हणजे ज्या लोकांनी सुरुवातीला केरळ स्टोरीला नावं ठेवली आता तिच लोकं या चित्रपटाचे कौतूक करत आहे. मला भेटून माफी मागत आहे. ही आश्चर्याची बाब आहे. चित्रपट न पाहता त्यांनी व्यक्त केलेली मतं ही त्यांनाच आता महागात पडत असल्याचे दिसून आल्याचे सेन यांनी सांगितले आहे. आज तक ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेन यांनी केरळ स्टोरीविषयीच्या अनेक गोष्टींबद्दल सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com