The Kerala Story : 'मुली सहजपणे त्यांच्या जाळ्यात अडकतात! हे तुम्हाला माहिती आहे का?'

अदानं या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना यापूर्वी चांगलेच खडसावले होते. त्यानंतर आता तिची पुन्हा एक जळजळीत प्रतिक्रिया समोर आली आहे.
The Kerala Story
The Kerala StoryInstagram

The Kerala Story movie Adah Sharma actress interview : द केरळ स्टोरी हा विषयच गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. १२ मे रोजी केरळ स्टोरी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या काळातच या चित्रपटानं शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाचं जेवढं कौतूक होतंय तेवढीच त्याच्यावर टीकाही होताना दिसते आहे.

अदा शर्मानं या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तिनं फातिमा नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अदानं या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना यापूर्वी चांगलेच खडसावले होते. त्यानंतर आता तिची पुन्हा एक जळजळीत प्रतिक्रिया समोर आली असून तिनं यामध्ये समाजात जे काही होते आहे याविषयी अनेकांना माहिती नसल्याचे म्हटले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दिग्दर्शक सुदीप्तो सेन, निर्माता विपुल शहा आणि आम्ही सर्वजणांनी त्या पीडितांची भेट घेतली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यातून अनेक गोष्टी आम्हाला कळल्या. त्याचाच आधार घेत समाजात जे काही होते आहे तेच मांडण्याचा प्रयत्न केरळ स्टोरीमधून करण्यात आल्याचे अदानं म्हटले आहे.

प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीनं खडसावलं...

द केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणणं खूप सोपं आहे. लोकांना रियॅलिटी काय आहे हे माहिती नाही. अनेकांनी तर हा चित्रपट देखील पाहिलेला नाही. तरीही त्याच्यावर बिनधास्तपणे ते टीका करतात. पण तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही. चित्रपटातून आम्ही समाजामध्ये जे काही होते आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कित्येक मुली त्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना मोठ्या प्रमाणात धर्मांतर करावे लागते. त्यांना त्यासाठी भाग पाडले जाते. हे तुम्हाला माहिती आहे का, मुली प्रेमात असतात, त्यांना त्यांच्याबाबत पुढे जे काही घडणार आहे त्याविषयी काही माहिती नसते. अशावेळी नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. आणि अशा घटना घडल्या आहेत. त्या आणखी सजगपणे मांडण्याचा प्रयत्न द केरळ स्टोरीतून करण्यात आला आहे. केरळ स्टोरीनं आतापर्यत दीडशे कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com