'The Kerala Story च्या निर्मात्यांच्या नखालाही धक्का लागला तर, आव्हाड तुम्हाला नाक्यावर...!' नितेश राणेंचं आव्हाडांना उत्तर

आव्हाडांनी जपून बोलावे. ते लटकावण्याची भाषा करतात तेव्हा आम्हालाही फटके देण्याची भाषा करता येते. अशा शब्दांत राणेंनी आव्हाडांना जशास तसे उत्तर दिले आहे.
The Kerala Story Movie Controversy NCP Jitendra
The Kerala Story Movie Controversy NCP Jitendra

The Kerala Story Movie Controversy NCP Jitendra Awahad : द केरळ स्टोरीनं देशभरामध्ये वेगळेच वातावरण निर्मिती केली आहे. पाच मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही पन्नास कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटावरुन सोशल मीडियावर वादही सुरु झाला आहे. तो वाद कोर्टापर्यत गेला आहे. महाराष्ट्रातही या चित्रपटाचे तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली प्रतिक्रया चर्चेत आली आहे.

आव्हाड यांनी द केरळ स्टोरी तयार करणाऱ्याला जाहीर फाशी द्यायला पाहिजे. अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांना जशास तसे उत्तर दिले आहे. तर यासगळ्यात भाजपचे नितेश राणेंची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. जितेंद्र आव्हाडांनी फाशी देण्याची, लटकावण्याची भाषा केली. जर आव्हाड अशा प्रकारची भाषा करत असतील तर आम्हाला देखील फटके देण्याची भाषा करता येते. हे आव्हाडांनी लक्षात घ्यावे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात मोठा गोंधळ सुरू झाला आहे. काहींनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर आक्षेप घेतला तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल केलेलं खळबळजनक वक्तव्यानं पुन्हा एकदा राजकीय वादाला सुरुवात झाले आहे.

The Kerala Story Movie Controversy NCP Jitendra
The Kerala Stroy चित्रपटाचा रामदास स्वामींशी खास संबंध.. अभिनेत्याचा Video व्हायरल

राणे यांनी आव्हाडावर आगपाखड करताना म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये हिंदूत्ववादी विचारांचे सरकार आहे. हे आव्हाडांनी लक्षात ठेवावे. आता काय तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. तुम्ही गेली अनेक वर्ष हिंदूंना लक्ष्य करत आहात. आव्हाडांची ही लटकावण्याची भाषा आता मुंब्रामध्ये चालणार नाही. तर आम्ही आव्हाड सारख्या जिहादी लोकांना जागोजागी नाक्यावर काय अवस्था करु हेही लक्षात घ्या. आम्ही देखील फटकावण्याची भाषा करु शकतो. पण कायदा सुव्यवस्थेमुळे आव्हाडांना समज देतो आहोत. असे राणे म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com