The Railway Men; अखेर यशराजची वेबसीरिजमध्ये एंट्री

चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या नावाची मोहोर उमटविणाऱ्या यशराजनं आता वेबसीरिजमध्ये पदार्पण केलं आहे.
The Railway Men; अखेर यशराजची वेबसीरिजमध्ये एंट्री
Updated on

चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या नावाची मोहोर उमटविणाऱ्या यशराजनं आता वेबसीरिजमध्ये पदार्पण केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून यशराजच्या पहिल्या वेबसीरिजबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर यशराजनं सोशल मीडियावर त्या संदर्भात खुलासा करत आपल्या आगामी वेबसीरिजबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांना एका आगळ्या वेगळ्या विषय़ावरील मालिका पाहायला मिळणार आहे. ओटीटीवरुन प्रेक्षकांना विविध विषयांवरील मालिकांची मेजवानी मिळत आहे. नाविन्यपूर्ण विषय, कल्पक मांडणी, सादरीकरण यामुळे वेबसीरिजचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

देशातील आघाडीची निर्मिती संस्था असणाऱ्या यशराजनं अखेर ओटीटीमध्ये इंट्री केली आहे. त्यांनी एकुण पाच वेगवेगळ्या विषयांवर वेब सीरिज तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यासंबंधी एका वृत्तत्रानं माहिती दिली आहे. पाचपैकी पहिल्या वेबसीरिजची घोषणा निर्माते आदित्य चोप्रा यांनी केली आहे. या मालिकेचा विषय भोपाळ गॅस गळती घटनेवर आधारित आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील विविध माध्यमांनी याप्रकरणीच दखल घेतली होती. या मालिकेमध्ये अभिनेता के के मेनन, दिव्यांदु, आर माधवन आणि बाबील खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

द रेल्वे मॅन या नावानं ही मालिका डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता सोशल मीडीयावर त्याचा टीझर व्हायरल झाला आहे. मालिकेच्या चित्रिकरणाचे काम सुरु झाले आहे. राहुल खेल यांचा मुलगा शिव खेल यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. ते या मालिकेच्या निमित्तानं चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवणार आहेत. यशराजचा हा एक मोठा प्रोजेक्ट असून त्याचे नाव द रेल्वे मॅन असे ठेवण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

The Railway Men; अखेर यशराजची वेबसीरिजमध्ये एंट्री
Movie Review; पोरकट, बालिश अन् उथळ हेच 'अंतिम - सत्य'
The Railway Men; अखेर यशराजची वेबसीरिजमध्ये एंट्री
Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com