web series : ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ सर्वांना मागे टाकत IMDBच्या यादीत नंबर वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Ring of Power News

‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ सर्वांना मागे टाकत IMDBच्या यादीत नंबर वन

The Ring of Power News ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ या अ‍ॅमेझॉन मालिकेने जगभरात दहशत निर्माण केली. सर्वांना मागे टाकत IMDB च्या यादीत नंबर वन बनले आहे. चित्रपटांच्या दृष्टिकोनातून हे वर्ष खूप खास ठरले आहे. कारण, यावर्षी अनेक बड्या स्टार्ससह बिग बजेट चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. परंतु, चित्रपटांच्या या गोंगाटात २०२२ साली अनेक मालिकांचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

यापैकी एक मालिका अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओची ‘The Lord of the Rings - The Rings of Power’ होती. ही हॉलिवूड मालिका प्रेक्षकांसाठी २ सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झाली. इतक्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या मालिकेला समीक्षकांची फारशी दाद मिळाली नाही तर समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

हेही वाचा: Boycott Bollywood : बॉयकॉट बॉलिवूड हा राक्षस आपले रौद्र रूप दाखवतोय

आता प्राईम व्हिडिओने प्रीमियरच्या दिवशी मालिकेला मिळालेल्या जागतिक दर्शकांची संख्या जाहीर केली आहे. ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. OTT प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज - द रिंग्ज ऑफ पॉवर’ पहिल्या दिवशी जगभरात २५ दशलक्ष किंवा २५ दशलक्ष दर्शकांनी पाहिला. यासह ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ ही IMDb च्या यादीत जगातील सर्वांत लोकप्रिय वेब सिरीज बनली आहे. एवढेच नाही तर या आकड्यांनुसार हा आतापर्यंतच्या कोणत्याही प्राईम सिरीजचा सर्वांत मोठा प्रीमियर मानला जात आहे.

‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज : द रिंग्ज ऑफ पॉवर’ ही ॲमेझॉन प्राईमची आतापर्यंतची सर्वांत महागडी वेब सिरीज असल्याचे म्हटले जाते. ही मालिका खूप मोठ्या प्रमाणावर शूट केली गेली आहे. याचे बजेट ४०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. एवढ्या मोठ्या बजेटमध्ये बनलेली ही मालिका जगातील २४० देशांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाली.

हेही वाचा: Money Laundering : संजय राऊतांची जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात धाव

भारतातही ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. प्राईमने ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ची क्रेझ कायम ठेवण्यासाठी मालिकेचा प्रत्येक आठवड्यात एक भाग प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत त्याचे फक्त २ भाग रिलीज झाले आहेत.

Web Title: The Ring Of Power Imdb Number One Ott Platform Web Series

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Web SeriesOTT Platform