Money Laundering : संजय राऊतांची जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Money Laundering Case News

Money Laundering : संजय राऊतांची जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात धाव

Sanjay Raut Money Laundering Case News मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) आर्थर रोड तुरुंगात बंद असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊत जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात पोहोचले आहे. राऊत १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे.

शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १ ऑगस्ट रोजी गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक केली होती. सुरुवातीला ईडीच्या कोठडीत राहिल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

२२ ऑगस्ट रोजी विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांची कोठडी ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतर राऊत यांना न्यायालयात हजर केले असता कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३१ जुलै रोजी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला होता आणि चौकशी केली होती.

हेही वाचा: तारा सुतारियाचा किलर लूक पाहून व्हाल आश्चर्यचकित

ईडीने २८ जून रोजी १,०३४ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर खासदारांच्या पत्नी वर्षा राऊत यांना केंद्रीय एजन्सीने समन्स बजावले होते, हे विशेष...

सुरुवातीला चार-चार दिवसांची कोठडी

शिवसेनेचे खासदार संजय यांना ईडीकडून १ ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडेनऊ आणि त्यानंतर ईडी कार्यालयात आठ तास कसून चौकशी केल्यानंतर अटक केली. सुरुवातीला संजय राऊतांना चार-चार दिवसांची ईडी कोठडी दिली होती.

Web Title: Sanjay Raut Shiv Sena Money Laundering Case Bail Approaches Special Pmla Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..