राजामौलींच्या RRR सिनेमानं कमावलेल्या 1000 करोडमागचं रहस्य आलं समोर... RRR Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Movie Poster- Jr. NTR, RamCharan, Alia Bhatt, AJay Devgan

राजामौलींच्या RRR सिनेमानं कमावलेल्या 1000 करोडमागचं रहस्य आलं समोर...

एस.एस.राजामौली(S.S.Rajamauli) यांच्या 'RRR' सिनेमानं जगभरात भारी कमाई केली आहे. या सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. जगभरात RRR सिनेमानं १००० करोडची कमाई केली आहे. मोठमोठे रेकॉर्ड्स या सिनेमानं आपल्या नावावर केले आहेत. तेव्हा आज या सिनेमानं १००० करोड कमावण्याची जादू नेमकी कोणत्या गोष्टीमुळे केली,कशात दडलंय ते रहस्य हे सांगणार आहोत.

हेही वाचा: प्रतिक गांधी व पत्रलेखा अभिनीत बहुचर्चित 'फुले' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

कुशल दिग्दर्शक

आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की एस.एस.राजामौली हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी मग्धीरा आणि बाहुबली या दोन सर्वोत्तम सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. बाहुबली सिनेमा तर राजामौली यांच्या करिअरमधला सर्वोत्तम सिनेमा ठरला. त्यांच्या बाहुबली सिनेमानं तर १५०० करोड पेक्षा अधिक कमाई केली होती.

उत्तम कलाकार

RRR सिनेमाची दुसरी खासियत आहे ती सिनेमातील दर्जेदार कलावंत. राजामौली यांनी सिनेमात कलाकार निवडताना दाक्षिणात्य प्रेक्षकांसोबतच बॉलीवूडच्या प्रेक्षकांचाही विचार केलेला दिसला, म्हणूनच सिनेमात दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार रामचरण आणि ज्यु.एनटीआर सोबतच बॉलीवूडचे स्टार कलाकार आलिया भट्ट आणि अजय देवगणही दिसले.

हेही वाचा: 'ऐश्वर्या नसेल तर जेवण मिळणं मुश्किल' असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

बेस्ट वीएफक्स

RRR सिनेमात जिथे उत्तम कलाकार आहेत तिथेच दुसरीकडे वीएफक्सही जादू करताना दिसतात. या सिनेमात काही सीन्स तर आपल्याला चकित करुन सोडतात. मग तो सीन ज्यु.एनटीआर चा वाघासोबत फाइट करतानाचा सीन असू दे की रामचरणचा राम अवतार. वीएफक्स तंत्रज्ञानाचा केलेला उल्लेखनीय वापर यामुळे हा सिनेमा पाहताना डोळ्याला थक्क करणारं काहीतरी पाहतोय असं सारखं वाटत राहतं.

कथा

राजामौलींकडे एखाद्या ऐतिहासिक सिनेमाला योग्य न्याय देण्याची अचूक नजर आहे हे त्यांनी अनेकदा सिद्ध केलं आहे. मग तो बाहुबली असू दे की मग्धीरा. ते एखाद्या ऐतिहासिक सिनेमाचं उत्तम दिग्दर्शन करतात. त्यामुळे केवळ ऐतिहासिक सिनेमा आवडणारा प्रेक्षकवर्ग नाही तर फारसा अशा सिनेमांच्या वाट्याला न जाणार प्रेक्षकही RRR सिनेमाच्या कथानकावर भुलताना दिसतोय.

हेही वाचा: 'भारतातील 2 मोठी सत्य जगासमोर येतील'; काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकाची घोषणा

बॉक्सऑफिसवर कोणता मोठा सिनेमा प्रदर्शित न होणं

RRR सिनेमानं १००० करोड कमावण्यामागे आणखी एक मोठं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे की या सिनेमासोबत दुसरा कुठला मोठा सिनेमा प्रदर्शित न होणं. RRR सिनेमा २४ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या दोन आठवडे आधीच द काश्मिर फाईल्स प्रदर्शित झाला होता आणि RRR प्रदर्शित होईपर्यंत द काश्मिर फाईल्स बॉक्सऑफिसवर थोडा मंदावला होता. ज्याचा RRR च्या निर्मात्यांना मोठा फायदा झाला. इतकंच काय, RRR नंतरही कुठलाच मोठा सिनेमा प्रदर्शित झाला नाही.

पाच भाषेत सिनेमा प्रदर्शित

RRR सिनेमा तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. ज्यामुळे जवळपास प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांची पसंती या सिनेमाला मिळाली आणि मिळत आहे. या सिनेमाने 1000 करोडहून अधिक कमाई आतापर्यंत केली आहे. आणि अद्याप घोडदौड सुरु आहे. त्यामुळे अर्थातच ही खास रहस्य या सिनेमाच्या यशामागे दडलेली आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही.

Web Title: The Secret Behind Rajamoulis Rrr 1000 Crore Buisness On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..