'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूरवर पाकिस्तानी गायिकेचं गाणं चोरल्याचा आरोप Kanika kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The theft of pakistani music continues:Hadiqa kiani on bollywood

'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूरवर पाकिस्तानी गायिकेचं गाणं चोरल्याचा आरोप

भारतीय म्युझिक इंडस्ट्रीनं एकापेक्षा एक सुंदर गाणी दिलेली आहेत. बॉलीवूडच्या(Bollywood)सिनेमांपासून ते वेगवेगळ्या गायकांच्या अल्बमपर्यंत आपण खुप सुंदर गाण्यांचे साक्षीदारही राहिले असाल. अशी कितीतरी गाणी आहेत ज्यांना आपण कधीच विसरु शकत नाही. पण असंही अनेकदा झालं आहे की एखाद्या आर्टिस्टवर गाण चोरल्याचा,कॉपी केल्याचा आरोप लागला आहे. आता असाच आरोप बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर(Kanika Kapoor) हिच्यावर लावला जात आहे.

Pakistani singer post against kanika kapoor

Pakistani singer post against kanika kapoor

कनिका कपूरनं 'बूहे बारिया' नावाचं एक गाणं लॉंच केलं आहे. या गाण्यात ती ऑरेंज कलरचा ड्रेस घालून दिसत आहे. आणि आपल्या सुंदर आवाजात ती हे गाणं गातानाही दिसत आहे. तिच्या गाण्याची खूप प्रशंसा केली जातेय. पण काही नेटकऱ्यांच्या लक्षात आलं की कनिकानं गायलेलं गाणं आधी कधीतरी ऐकलेलं आहे. तेव्हा काही नेटकऱ्यांनी गाण्याचा पिछा पुरवत अभ्यासपूर्वक शोध लावून शेवटी माहिती करुनचं घेतलं गाण्यामागचं सत्य. त्या नेटकऱ्यांनी लगेच कनिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या की हे गाणं पाकिस्तानी गायिका हदिका कियानीनं गायलं आहे.

Netizens React on Kanika Kapoor Post

Netizens React on Kanika Kapoor Post

हदिका कियानीला(Hadiqa kiani) जेव्हा याबाबत कळलं तेव्हा मात्र ती खवळून उठली,गप्प बसली नाही. हदिकाने कनिका कपूरचा इन्स्टाग्रामवर व्यवस्थित पाहुणचार केला. तिनं तिला शाब्दिकरित्या चांगलंच फटकारलं आहे. गाण्याच्या फोटोला शेअर करीत तिनं म्हटलं आहे की, ''माझ्याकडे याचे राइट्स आहेत आणि या गाण्याला कनिका अन् तिच्या टीमनं चोरलेलं आहे''. यासोबतच हदिकानं चाहत्यांनी याबाबतीत दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभारही मानले आहेत.

हेही वाचा: हिंदी भाषा वादात कंगनाची उडी; म्हणाली,'संस्कृतच हवी राष्ट्रीय भाषा कारण...'

पाकिस्तानी गायिका हदिकानं गाण्याविषयी लिहिलं आहे, ''आणखी एकदा माझ्या आईलं लिहिलेल्या गाण्याची वाट लावण्यात आली आहे. यासाठी माझी परवानगी देखील घेतली गेलेली नाही. ना यासाठी योग्य किंमत मोजली आहे. बसं फक्त माझ्या आईनं लिहिलेल्या अन् मी रेकॉर्ड केलेल्या गाण्याला चोरायचं काम केलं आणि सोयीस्कर पैसे कमवण्याचं साधन बनवलं माझ्या गाण्याला''. हे पहिल्यांदाच झालेलं नाही जेव्हा एखाद्या भारतीय गायक-गायिकेवर गाणं चोरल्याचा आरोप लागला आहे. याआधी गायक सलिम मर्चंटवर देखील पाकिस्तानी अभिनेता आणि गायक फरहान सईननं गाण चोरल्याचा आरोप लावला होता.

Web Title: The Theft Of Pakistani Music Continueshadiqa Kiani On Bollywood Using Her Song Without Permissionblame Kanika

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top