Ott Release: फुक्रे 3 अन् द व्हॅक्सीन वॉर धडकणार ओटीटीवर! कुठे अन् कधी पहाल हे चित्रपट

The Vaccine War and Fukrey 3 awaited movie releases on this OTT in November Entertainment Treat
The Vaccine War and Fukrey 3 awaited movie releases on this OTT in November Entertainment TreatEsakal
Updated on

The Vaccine War and Fukrey 3 : 'फुक्रे 3' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' हे बॉलिवूडमधील चर्चेत राहिलेले चित्रपट होते. या दोन्ही चित्रपटांचा विषय जरी वेगळा असला तरी दोन्ही सिनेमांनी एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर एंट्री मारली होती.

'फुक्रे 3' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' हे दोन्ही चित्रपट 28 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर क्लॅश झाले होते. मात्र या युद्धात कमाईच्या बाबतीत 'फुक्रे 3' ने बाजी मारली होती. आता हे सिनेमे ओटीटीवर रिलिज होणार आहेत.

The Vaccine War and Fukrey 3 awaited movie releases on this OTT in November Entertainment Treat
Jhimma 2 Review: आनंदाचा, करमणूकीचा, मनमोकळं करणाऱ्या सुंदर आठवणींचा "झिम्मा २"

'द व्हॅक्सिन वॉर'

या चित्रपटात विवेक अग्निहोत्री यांनी स्वदेशी कोरोना लस बनवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांची धडपड दाखवली आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आता 'द व्हॅक्सिन वॉर' OTT रिलीजसाठी सज्ज आहे.

24 नोव्हेंबरपासून डिस्ने+ हॉटस्टारवर हा सिनेमा प्रीमियर होईल. याबाबत विवेक अग्नीहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवर माहिती दिली आहे.

या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'अशा जगात पाऊल टाका जिथे धैर्याने संकटाचा सामना करावा लागतो. 24 नोव्हेंबरपासून 'द व्हॅक्सिन वॉर' फक्त डिस्ने+ हॉटस्टारवर पहा.

या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर यात अनुपम खेर, नाना पाटेकर, पल्लवी जोशी, रायमा सेन आणि सप्तमी गौडा यांनी महत्वाच्या भुमिका साकारल्या होत्या. 10 कोटी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने 6 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता.

The Vaccine War and Fukrey 3 awaited movie releases on this OTT in November Entertainment Treat
Animal Film: बॉबी देओल चित्रपटात एक शब्दही बोलणार नाही! कारणही आलं समोर

'फुक्रे 3'

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी 'फुक्रे 3' ने थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता हा सिनेमा देखील OTT प्लॅटफॉर्म आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Amazon Prime Video वर हा चित्रपट आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यापूर्वी या चित्रपटाला पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत होते.

The Vaccine War and Fukrey 3 awaited movie releases on this OTT in November Entertainment Treat
Jamie Foxx: ऑस्कर विजेता अभिनेत्यावर महिलेने केला लैंगिक छळाचा आरोप! गुन्हा दाखल

'फुक्रे 3' ने बॉक्स ऑफिसवर 96.30 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली. या चित्रपटात वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग, पुलकित सम्राट आणि पंकज त्रिपाठी सारखे कलाकार दिसले.

'फुक्रे' नेटफ्लिक्सवर दिसत असला तरी तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'फुक्रे 3' पाहू शकता. त्यांचे चित्रपटांचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले आहे. तर चित्रपटाची कथा विपुल विग यांनी लिहिली आहे.

आता प्रेक्षक घर बसल्या या दोन्ही चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com