नो गुड न्यूज प्लिज : अनुष्का शर्मा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अनुष्का बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यावर बोलणंही टाळते; पण आता तिने प्रेग्नंसीबाबत होणाऱ्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. अनुष्काला एका कार्यक्रमादरम्यान तिच्या प्रेग्नंसीबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा या निव्वळ अफवा असल्याचं तिने सांगितलं. अनुष्का म्हणाली, "मी सध्या तरी माझ्या चित्रपटांवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी आता तरी वेळ नाही. मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी या निव्वळ अफवा आहेत.' एकवेळ तुम्ही लग्नाचं सत्य लपवू शकता; पण प्रेग्नंसी तुम्ही लपवू शकत नाही. सत्य काय आहे हे चार महिन्यांतच तुमच्या समोर येईल. विराट आणि मी सध्या इतके बिझी आहोत की, आम्हाला एकमेकांनाही पुरेसा वेळ देता येत नाही, असंही ती म्हणाली. अनुष्काच्या या उत्तरामुळे तात्पुरता तरी तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना फुलस्टॉप लागलाय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no any good news said Anushka Sharma