Pathan Movie: चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यात झाले हे मोठे 3 बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepika padukone and shahrukh khan

Pathan Movie: चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यात झाले हे मोठे 3 बदल

शाहरुख खानच्या कमबॅक चित्रपट 'पठाण'ची जनता आतुरतेने वाट पाहत आहे. 'बेशरम चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर वादही पेटला. या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगावर सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत आक्षेप घेण्यात आले असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हटले आहे.

चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांचेही विधान आले की, 'पठाण'मध्ये सेन्सॉरच्या नियमानुसार बदल करण्यात आले आहेत. आता बातम्या येत आहेत की सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच 'बेशरम रंग' या गाण्यात देखील बदल करण्यात आले आहेत, चित्रपटातील संवादांमध्येही अनेक शब्द बदलण्यात आले आहेत.

हेही वाचा: Kedar Shinde: यापुढे तीच्या ओटीत.. केदार शिंदे यांची बायकोसाठी खास पोस्ट..

'पठाण'च्या बेशरम रंग या गाण्यात किमान तीन मोठे बदल समोर येत आहेत. रिपोर्टनुसार, 'बेशरम रंग'मध्ये दीपिकाच्या शरीराचे काही क्लोज-अप शॉट्स काढण्यात आले आहेत. तसेच, गाण्यातील 'बहुत तंग किया' या गाण्यांसोबत असलेले काही सेन्स्युस व्हिज्युअल देखील बदलण्यात आले आहेत आणि त्याऐवजी इतर शॉट्स वापरण्यात आले आहेत. 'बेशरम रंग'मधून दीपिकाची साइड पोजही काढून टाकण्यात आली आहे. या गाण्यातील दीपिकाच्या वादग्रस्त 'केसरी रंगाच्या बिकिनी'चे शॉट्स अजूनही आहेत की काढून टाकण्यात आले आहेत याची माहिती समोर आलेली नाही.

'पठाण'मधील 13 ठिकाणी पीएमओ बदलण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. 'पंतप्रधान' बदलून राष्ट्रपती किंवा मंत्री करण्यात आले आहे. कथेनुसार, तपास यंत्रणा 'रॉ' चे नाव बदलून 'हमारे' करण्यात आले आहे. 'इससे सस्ती स्कॉच नहीं मिली' या डायलॉगमध्ये स्कॉचच्या जागी 'ड्रिंक' हा शब्द वापरण्यात आला आहे. पठाणमध्ये अशोक चक्राऐवजी 'वीर पुरस्कार', 'एक्स-केजीबी'च्या जागी 'एक्स-एसबीयू' आणि 'मिसेस भारतमाता' ऐवजी 'हमारी भारतमाता' करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

चित्रपटाच्या एका सीनवर सुरू असलेल्या टेक्स्ट मध्ये 'ब्लॅक प्रिझन, रशिया' हे बदलून 'ब्लॅक प्रिझन' करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलांसह सेन्सॉर बोर्डाने 'पठाण'च्या निर्मात्यांना 'यू/ए' रेटिंग दिले आहे. चित्रपटाचे किती सेकंदांचे फुटेज सेन्सॉर करण्यात आले आहे याबद्दल तपशील समोर आलेला नाही, परंतु आता चित्रपटाचा रनटाइम 146 मिनिटांचा म्हणजेच 2 तास 26 मिनिटांचा झाला आहे.शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.