esakal | लॉकडाऊनच्या काळात 'ह्या' अभिनेत्री बनल्या हेअरस्टायलिस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

SONAM

लॉकडाऊनच्या काळात घरात बसून नेमकं करायचं कायं? हा प्रश्न अनेकांना पडला. आता हेच बघा ना कलाविश्वातील काही स्टायलिस्ट अभिनेत्री चक्क हेअरस्टायलिस्ट बनल्या आहेत. त्यांच्यामधील हे हिडन टॅलेंट आहे असंच म्हणावं लागेल. 

लॉकडाऊनच्या काळात 'ह्या' अभिनेत्री बनल्या हेअरस्टायलिस्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनच्या काळात घरात बसून नेमकं करायचं कायं? हा प्रश्न अनेकांना पडला. सामान्यांपासून ते अगदी उद्योजक, कलाकार मंडळींवरही घरी बसण्याची वेळ कोरोना विषाणूमुळे आली. मग काय घरात राहून आपल्या आवडीचं काम करायचं अनेकांनी ठरवलं. तर काहीजणांनी घरातील साफसफाईसाठी कंबर कसली. बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारे काही चेहरे तर चक्क त्यांच्या स्वयंपाक घरात दिसले. हे सारं बदलतं चित्र पाहायला मिळालं ते लॉकडाऊनमुळेच. या लॉकडाऊनकडे प्रत्येकाने सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे हे या कलाकारमंडळींनी दाखवून दिलं. आता हेच बघा ना कलाविश्वातील काही स्टायलिस्ट अभिनेत्री चक्क हेअरस्टायलिस्ट बनल्या आहेत. त्यांच्यामधील हे हिडन टॅलेंट आहे असंच म्हणावं लागेल. 

हे ही वाचा: प्रेक्षकांची नस ओळखलेली एकता कपूर लॉकडाऊनमध्येही स्वस्थ बसलेली नाही..पाहा कोणत्या प्रोजेक्टवर करतेय काम?

अभिनेत्री अनुष्का शर्मापासून ते टिव्ही स्टार दिव्यांका त्रिपाठीपर्यंत साऱ्याच अभिनेत्री आपल्या पतीसाठी हेअरस्टायलिस्ट बनल्या आहेत. हे आम्ही नव्हे तर चक्क या अभिनेत्रींनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो पोस्ट करत सांगितले आहे.

दिव्यांका त्रिपाठीचा पती अभिनेता विवेक दहियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिव्यांका त्याचे केस कापतानाचा फोटो शेअर केला आहे. हेअरस्टाईलबाबत तुम्ही तुमच्या पत्नीवर विश्वास ठेऊ शकता का? असा मजेशीर प्रश्नही त्याने फोटो शेअर करताना विचारला आहे.

तर दुसरीकडे अनुष्का शर्मा विराट कोहलीची एक हटके हेअरस्टाईल करत आहे. या क्युट कपलचा हेअरस्टाईल करताना व्हिडिओ तर सोशल मीडियावर प्रचंड गाजला. माझी ही नवी हेअरस्टाईल अनुष्काने केली असल्याचे या व्हिडिओमध्ये विराट सांगत आहे.

अभिनेत्री तिस्का चोप्रादेखील आपल्या पतीची हेअरस्टायलिस्ट बनली आहे. चित्रपटांचे काम लवकरच सुरु नाही झाले तर मी माझ्या करिअरचा दुसरा पर्याय निवडला आहे असे तिस्काने गमतीने म्हटले आहे. 

एवढंच काय तर बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरदेखील आनंद आहुजाची हेअरस्टाईल उठून दिसावी म्हणून विशेष मेहनत घेताना दिसली.

अभिनेत्री हुमा खुरेशीने तर चक्क स्वतःचे केस स्वतःच कापले. तिने तिच्या केसांचा फ्रिंज कट केला.

या साऱ्या अभिनेत्री स्वतःची आपल्या जोडीदाराची हेअरस्टाईल करण्यात व्यस्त असतानाच अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या मुलांसाठी हेअरस्टायलिस्ट बनली. तिने आपल्या  घराच्या बालकनीमध्ये बसून मुलाचे केस कापले.

लॉकडाऊनने अभिनेत्रींना हेअरस्टायलिस्ट बनण्याची अधिक ओढ लागली आहे.  

these actresses became a hairstylist during the lockdown  

loading image