esakal | 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी अशी बदलली, दिवाळीमधील फोटो झाले व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

harshali

सिनेमात मुन्नीची भूमिका हर्षाली मल्होत्रा हिने साकारली होती. हर्षाली या सिनेमानंतर खूप प्रसिद्ध झाली. सोशल मिडियावर सध्या तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती कोणालाच ओळखू येत नाहीये.  

'बजरंगी भाईजान'ची मुन्नी अशी बदलली, दिवाळीमधील फोटो झाले व्हायरल

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा २०१५ मध्ये रिलीज झालेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला. खासकरुन या सिनेमातलं मुन्नीचं पात्र सगळ्यांना लक्षात राहिलं होतं. एकही डायलॉग नसलेल्या मुन्नीने तिच्या अभिनयानेच सगळ्यांच्या मनात घर केलं होतं. सिनेमात मुन्नीची भूमिका हर्षाली मल्होत्रा हिने साकारली होती. हर्षाली या सिनेमानंतर खूप प्रसिद्ध झाली. सोशल मिडियावर सध्या तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती कोणालाच ओळखू येत नाहीये.  

हे ही वाचा: 'बिग बॉस'च्या निर्णयावर माजी स्पर्धक देवोलिना संतापली  

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमात जेव्हा हर्षालीने मुन्नीची भूमिका साकारली होती तेव्हा त्यावेळी ती केवळ ७ वर्षांची होती. हर्षाली आता १२ वर्षांची झाली आहे त्यामुळे तिच्या चेह-यात देखील बदल झाला आहे. हर्षाली सोशल नेटवर्किंग साईट इंस्टाग्रामवर चांगलीच ऍक्टीव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर ४ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

हर्षालीने दिवाळी आणि भाऊबीजेच्या खास दिवसांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हर्षालीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. यामध्ये ती पारंपरिक ड्रेस सुटमध्ये दिसून येतेय.

'बजरंगी भाईजान' या सिनेमात हर्षालीने मुन्नीची मुक-बधीर मुलीची भूमिका साकारली होती. मात्र सिनेमात एकही डायलॉग नसलेल्या मुन्नीने तिच्या अभिनयाने आणि तिच्या निरागसतेनेच सगळ्यांवर जादू केली. तीच लहानशी मुन्नी आता मोठी झाली आहे आणि आताही तितकीच सुंदर दिसतेय.

these photos of harshaali malhotra went viral on social media