'बिग बॉस'च्या निर्णयावर माजी स्पर्धक देवोलिना संतापली

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 18 November 2020

गेल्या आठवड्यात शार्दुल पंडित आणि रुबीना दिलैक यांना एकसमान वोट्स मिळाले होते. मात्र तरीही बिग बॉसने शार्दूलला घरातून एलिमिनेट केलं. मेकर्सच्या या निर्णयावर माजी स्पर्धक आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य नाराज आहे.

मुंबई- टेलिव्हिजनवरील सगळ्यात चर्चित रिऍलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. बिग बॉसचा प्रत्येक सिझन सुरु झाल्यापासूनच चर्चेत असतो. नुकताच बिग बॉस १४ सिझन सुरु होऊन आता पाच आठवडे उलटून गेले आहेत. दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर जात असतो. याच नियमाप्रमाणे या आठवड्यात शार्दूल पंडित शोमधून बाहेर पडला. आश्चर्याची बाब म्हणजे या एपिसोडमध्ये नॉमिनेशन राऊंडमध्ये शार्दुलसोबत रुबिना दिलैक देखील होती. दोघांनाही एकसारखेच वोट मिळाले होते. 

हे ही वाचा: धनुष ठरला खरा 'राउडी', त्याच्या 'या' गाण्याने पार केला १ अब्ज व्ह्युजचा टप्पा    

गेल्या आठवड्यात शार्दुल पंडित आणि रुबीना दिलैक यांना एकसमान वोट्स मिळाले होते. मात्र तरीही बिग बॉसने शार्दूलला घरातून एलिमिनेट केलं. मेकर्सच्या या निर्णयावर माजी स्पर्धक आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य नाराज आहे. बिग बॉसने प्रामाणिकपणे खेळ निर्णय घ्यावा, काही ठराविक स्पर्धकांना पाठिंबा देऊ नये असं म्हणत तिने बिग बॉसवर निशाणा साधला आहे.

देवोलिना बिग बॉसची माजी स्पर्धक आहे. बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये ती झळकली होती. या पार्श्वभूमीवर तिने शार्दूलचं नाव घेत बिग बॉसवर भाष्य केलं. “रुबीना आणि शार्दूलला एकसारखेच वोट मिळाले होते. जसे गेल्या सीझनमध्ये मला आणि रश्मीला मिळाले होते. बिग बॉस असे निर्णय घेणं आता थांबवा. अन्यथा मला राग येईल. खूप चांगला खेळ सुरु होता. आपला खोडकर मेंदू चालवणं कृपया थांबवा. कधीही विसरु नका बिग बॉसमधील खरी क्वीन मीच आहे. त्यामुळे या राणीला राग येईल असं काही करु नका.” अशा आशयाचं ट्विट करुन देवोलिनाने बिग बॉसच्या मेकर्सवर निशाणा साधला आहे.

तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचच लक्ष वेधून घेतंय. बिग बॉसच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

what did salman khan say like this angry devoleena bhattacharjee said do not make me angry  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what did salman khan say like this angry devoleena bhattacharjee said do not make me angry