esakal | श्रेयस तळपदेच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन
sakal

बोलून बातमी शोधा

श्रेयस तळपदेच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन

श्रेयस तळपदेच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया आणि अवंतिका तसेच दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. हो हे खरं आहे. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका "माझी तुझी रेशीमगाठ" या मालिकेतून श्रेयस पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि या मालिकेची झलक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Shreyas Talpade come back in Marathi television)

हेही वाचा: लग्नाची गोष्ट : सुखी संसाराची ‘फत्तेशिकस्त’

मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' हि मालिका खूप वेगळी आहे ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल."

हेही वाचा: ऑन स्क्रीन : १४ फेरे : लांबलेली लग्नघटिका

loading image
go to top