Boxoffice Movies: यंदाचा वीकेंड खास, हे मराठी चित्रपट गाजवतायत बॉक्स ऑफिस

या वीकेंडला मराठी प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची चटकदार मेजवानी..
these weekend released movies bollywood and marathi movie box office collection
these weekend released movies bollywood and marathi movie box office collection sakal
Updated on

Boxoffice Movies : गेल्या काही दिवसांत हिंदी चित्रपटांचे हाल आपण सगळेच बघत आहोत. बॉयकॉट म्हणजेच निषेध या मोहिमेचा बॉलीवुडला मोठा फटका बसला आहे. अशाने अनेक बिग बजेट सिनेमे आपटले. यंदाच्या आठवड्यात मात्र परिस्थिती जरा समाधान कारक आहे. 'ब्रह्मास्त्र'ची कमाई जोरदार आहे तर मराठी चित्रपटही सरशी करत आहेत. जाणून घेऊया यंदा बॉक्सऑफिसच्या शर्यतीत कोणते चित्रपट आहेत...

ब्रह्मास्त्र (Brahmastra) : या विकेंडला 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तर 'बॉईज 3', 'भाऊबळी','रुप नगर के चीते' हे सिनेमे देखील चांगली कमाई करत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 300 कोटींची कमाई केली. आलिया-रणबीरसह अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे दिग्गज या चित्रपटात आहेत.

बॉईज 3 (Boyz 3) : 'बॉईज'या चित्रपटाचा पहिला आणि दुसरा भाग सुपरहीट झाल्यानंतर शुक्रवारी या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित झाला. विदुला चौगुले, सुमंत शिंदे ,पार्थ भालेराव, प्रतीक लाड या कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला 'बॉईज 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  तरुणांची विशेष गर्दी या चित्रपटाला पाहायला मिळत आहे.

भाऊबळी (Bhaubali) : 'भाऊबळी' हा समाजातील वर्ग भेदावर विनोदी अंगाने भाष्य करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात तबळल 50 कलाकार तर अनेक विनोदवीरांची फौज असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. किशोर कदम, मनोज जोशी, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, रेशम टिपणीस, प्रियदर्शिनी इंदलकर, आशय कुलकर्णी, संतोष पवार, तुषार घाडीगावकर, शार्दूल सराफ, सचिन भिलारे, आनंद अलकुंटे, विश्वास सोहनी, रसिका आगाशे, विजय केंकरे, श्रीकर पित्रे असे सिनेसृष्टीतील कसलेले, लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खदखदून हसवत आहेत. 

रूप नगर के चीते (Roop Nagar Ke Cheetey) : 'रूप नगर के चीते' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. करण परब, कुणाल शुक्ल, आयुषी भावे, हेमल इंगळे, सना प्रभू हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटालाही प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com