"हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप

"हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप

राजकीय भूमिका घेतल्याने सिने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) या चॅनेलवरील 'मुलगी झाली हो' या सिरियलमधून काढून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून त्यांना समर्थन दिलं जात आहे. यासंदर्भात 'सकाळ'ने त्यांच्याशी बातचित केली असता त्यांनी ही बातमी खरी असल्याचं सांगितलं. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलंय. किरण माने सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडत असतात. त्या निमित्ताने ते सातत्याने चर्चेतही असतात.

"हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप
NEET-UG ची प्रवेश प्रक्रिया १९ जानेवारीपासून; असं असेल वेळापत्रक

'सकाळ'शी बोलताना त्यांनी म्हटलंय की, ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही.

पुढे ते म्हणाले की, आम्ही जेंव्हा नाटकात काम करायचो तेंव्हा काँग्रेसवर इंदिरा गांधी, राजीव गांधींवर टीका करायचो. तेंव्हा काँग्रेसी नेते पण येऊन टाळ्या वाजवायचे. असं नव्हतं की तुम्ही आमच्यावर टीका करु नका वा अशाप्रकारची दहशत नव्हती. पण आता एक वाक्य जरी लिहलं तरी 'तुम्ही असं कसं लिहू शकता' म्हणत दहशत माजवली जातेय.

"हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप
Entertainment : ' बोल्ड ' सीनमूळे हा सिनेमा सापडला वादाच्या भोव-यात | पाहा व्हिडिओ

मला बरंच ट्रोल केलं गेलं. बरीच घृणास्पद टीका केली गेली. त्यावेळी मी चिडून काही वक्तव्ये त्या ट्रोलर्सच्या विरोधात केलेली आहेत. पण कधीही कुणाचं नाव घेऊन अर्वाच्य शब्दात काही बोललेलो नाहीये. पण ही झुंडशाही आहे. पण मी केलेली पोस्ट्स तिरकस होती की, 'आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो..' अशी माझी पोस्ट्स होती. त्या पोस्ट्बाबत यांनी लावून घेतलं की, हे आमच्या नेत्याला बोलले. म्हणून त्यांनी अक्षरश: स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं की यांना सिरियलमधून काढून टाकण्यात यावं. मला असं वाटत होतं की, महाराष्ट्रात असं नाही होणार. अशाप्रकारची झुंडशाही बिहार-यूपीमध्ये चालू शकते. पण माझ्याबाबतीत असं झालंय आणि मी बळी पडलोय. पण ठिक आहे मी यातून उभा राहिन. मी खंबीर आहे. हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे. हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. पण आता लोकांनी ठरवायचंय की, आपण आता काय करायचंय, असंही ते म्हणाले आहेत.

फेसबुकवर त्यांनी उद्वेगाने पोस्टही केली आहे. "काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा...
गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !" असं त्यांनी टाकलंय.

हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का..?

दरम्यान, किरण मानेंच्या समर्थनार्थ अनेकजण फेसबुकवर व्यक्त होत त्यांना समर्थन देत आहेत. एका फेसबुक युझरने लिहलंय की, राजकीय भूमिका घेतल्याने आपल्या सर्वांचे लाडके किरण माने सर यांना STAR Pravah ने मालिकेतून काढून टाकले आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का..?जो माणूस वास्तव आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतोय, जो माणूस तुमच्या आमच्या हक्कासाठी इथ उघडपणे व्यक्त होतोय,ज्यावेळी गरज असते त्यावेळी इतर कलाकार गप्प बसलेले असताना हा माणूस तुमचा माझा आवाज बनून आपली लेखणी आपल्यासाठी झिजवतो आहे... त्या माणसासाठी आता आपण सर्वांनी उभे राहायची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com