esakal | विराटने पहिल्याच भेटीत अनुष्कासमोर असं काही केलं की...

बोलून बातमी शोधा

Virat Kohli and Anushka Sharma
विराटने पहिल्याच भेटीत अनुष्कासमोर असं काही केलं की...
sakal_logo
By
स्वाती वेमूल

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणजे क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. या दोघांची लव्हस्टोरी, पहिली भेट, मध्यंतरीच्या काळात ब्रेकअपच्या चर्चा आणि मग स्वप्नवत लग्न याबद्दलच्या बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. प्रत्येक लव्हस्टोरीची पहिली भेट ही फार खास असते. नात्याला कितीही वर्षे झाली तरी पहिल्या भेटीच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. विराट-अनुष्काची पहिली भेटसुद्धा अशीत खास होती. एका अमेरिकन टीव्ही शोमध्ये विराटने अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीला किस्सा सांगितला होता.

विराट-अनुष्का २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगनिमित्त पहिल्यांदा भेटले. या भेटीबद्दल विराट म्हणाला, "पहिल्याच भेटीत अनुष्कासोबत काय बोलावं हे मला सुचत नव्हतं. खरंतर मी थोडा नर्व्हस होतो, म्हणून हलकीफुलकी मस्करी करत वातावरण गमतीशीर ठेवण्याचा प्रयत्न केला. अनुष्का जेव्हा सेटवर आली तेव्हा ती तिच्या हिल्समुळे खूपच उंच दिसत होती. मी तिला सहज म्हटलं की, तू माझ्यापेक्षाही उंच दिसतेय. त्यावर तिने उत्तर दिलं की, मी काही सहा फूट उंच वगैरे नाही. मी तिची मस्करी करत म्हणालो की, यापेक्षा अजून हिल्सच्या चपला मिळाल्या नाही का? त्यानंतर ती थोडी चिडल्यासारखी वाटली. माझा विनोद करण्याचा प्रयत्न फसला हे मला कळून चुकलं होतं. त्यामुळे तिच्यासमोर पहिल्यांदा मीच मूर्ख ठरलो."

हेही वाचा : मुंबईच्या लोकलमध्ये अवतरली 'रेखा'

'विरुष्का' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीने २०१७ मध्ये लग्न केलं. या लग्नाची सर्व प्लॅनिंग अनुष्काने केली होती. नुकताच अनुष्काने मुलीला जन्म दिला. वामिका असं तिचं नाव ठेवण्यात आलं आहे.