esakal | मुंबईच्या लोकलमध्ये अवतरली 'रेखा'

बोलून बातमी शोधा

transgender pooja sharma
मुंबईच्या लोकलमध्ये अवतरली 'रेखा'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सध्या मुंबईच्या रेखाची जोरदार चर्चा सुरु आहे. तिला पाहता क्षणीच नेटक-यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. तिच्या वेगवेगळ्या अदा प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला रेखा असे म्हटले आहे. ही रेखा कोण आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ती आहे मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणारी रेखा. तिची तुलना बॉलीवूडच्या रेखाशी केली जात आहे. तिचं खरं नाव पूजा शर्मा आहे. आणि ती एक ट्रान्सवुमन आहे.

तिच्या सुंदरतेची तुलना रेखाशी होताना दिसते. तिची स्टाईल वेगळी आहे. मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना ती लोकांचे मनोरंजन करत असते. त्या दरम्यान तिचा एक व्हि़डिओही व्हायरल झाला आहे. तिचा ड्रेसिंग सेन्सही जबरदस्त आहे. त्यामुळे ती जेव्हा लोकलमधून प्रवास करते तेव्हा तिच्याभोवती लोकांचा गराडा पडत असल्याचे दिसून आले आहे. पूजा आपली तुलना रेखाशी करते. त्यामुळे तिला अनेकजण रेखाच्या नावानं ओळखतात. खरं तर ती लोकलमध्ये भीक मागून पैसे कमवते. मात्र तिच्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवत नाही.

आता पूजाला मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणारे बरेचसे प्रवासी ओळखतात. लोकं जेव्हा तिच्याजवळ येतात. तेव्हा ती पैसे मागते. अशावेळी लोकं तिला हसता हसता पैसेही देतात. मुंबईतली लोकलमध्ये प्रवाशांचे मनोरंजन करणारी पूजा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. तिला रोज पाहणारी लोकं सांगतात की ती खूपच शांत स्वभावाची व्यक्ती आहे. ती नेहमी हसत असते. पूजाला रेखा हे नाव तिच्या फॅन्सनं दिलं आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालीत रेखा असल्याचा प्रत्यय येतो. असे तिचे फॅन्स सांगतात. पूजा म्हणते, ही सगळी देवाची कृपा आहे. लोकं मला मी ट्रान्स आहे असे समजत नाही. याचा मला आनंद आहे.