esakal | 'धक्कादायक, शब्द अपुरे पडतील'; सिद्धार्थच्या निधनावर कलाकारांच्या शोक भावना
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 13 Siddharth shukla has been admitted to hospital

'धक्कादायक, शब्द अपुरे पडतील'; सिद्धार्थच्या निधनावर कलाकारांच्या शोक भावना

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मनोरंजन विश्वातील अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे Sidharth Shukla हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 'हे खूपच धक्कादायक वृत्त आहे. त्याच्या जवळच्या, प्रियजनांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. त्याच्या आत्म्याला शांती लाभो', असं ट्विट अभिनेता मनोज वाजपेयीने केलं आहे.

'फक्त १४ दिवस आधीच आपण भेटलो होतो. आपण भांडलो आणि एकमेकांपासून दूर गेलो. पण आता तुझ्या निधनाच्या वृत्ताने मला एक गोष्ट शिकवली आहे की, प्रत्येकाला माफ केलं पाहिजे', अशा शब्दांत अभिनेत्री कोईना मित्राने भावना व्यक्त केल्या. 'खूप लवकर आम्हाला सोडून गेलास', असं ट्विट करत मल्लिका शेरावतने श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गुरुवारी सकाळी सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले. कूपर हॉस्पिटलने 'पीटीआय'ला याबद्दलची माहिती दिली. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा कुटुंब आहे.

सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

loading image
go to top