Golden Globe: 'नाटू नाटू'फेम केरावानीं आधी या भारतीय संगीतकाराला मिळाला आहे गोल्डन ग्लोब..

केरावनी यांच्याआधी आणखी एका भारतीय संगीतकाराने गोल्डन ग्लोब पुरस्कारावर नाव कोरले
This is the first indian musician got golden globe award before RRR natu natu
This is the first indian musician got golden globe award before RRR natu natuSAKAL

RRR सिनेमातील नाटु नाटु गाण्याने जगप्रसिद्ध गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळवला. एम एम केरावनी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. भारतीय गाण्याची आणि सिनेमाची जागतिक स्तरावर दखल घेतल्याने एम एम केरावनी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. केरावनी यांच्याआधी आणखी एका भारतीय संगीतकाराने गोल्डन ग्लोब पुरस्कारावर नाव कोरले आहे. ते आहेत संगीतकार ए . आर. रेहमान.

(This is the first indian musician got golden globe award before RRR natu natu)

ए . आर. रेहमान यांची आजवर दोन वेळा प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारात दखल घेतली गेलीय. २००९ ला १२६ हव्हर्स या सिनेमासाठी बेस्ट ओरिजिनल स्कोर म्हणून ए आर रेहमान यांना नामांकन मिळाले होते. तर २०११ ला स्लमडॉग मिलेनियर सिनेमासाठी बेस्ट ओरिजिनल स्कोर म्हणून ए आर रेहमान यांना पुरस्कार मिळाला. गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळालेले पहिले भारतीय संगीतकार म्हणून ए आर रेहमान यांची ओळख आहे.

This is the first indian musician got golden globe award before RRR natu natu
Krrish 4: 'क्रिश ४'ची भरारी लांबणीवर!.. हृतिकनेच संगितलं सिनेमा रखडण्याचं कारण..

ए आर रेहमान नंतर १० वर्षांनी नाटु नाटु गाण्यानिमिताने एम एम केरावनी यांना या भारतीय संगीतकाराने या पुरस्करावर स्वतःचं नाव कोरलंय. भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. "केवळ अतुलनीय! समस्त भारतीयांतर्फे आणि तुमच्या फॅन्सतर्फे अभिनंदन", अशा शब्दात ए आर रेहमान यांनी एम एम केरावनी यांचं अभिनंदन केलंय.

ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केली. सोशल मीडियावर सिनेमाची अजूनही हवा आहे. लवकरच RRR सिनेमाचा सिक्वेल येणाची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com