आमिरने का मागितली KGF 2 निर्मात्यांची माफी? | Aamir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan and Yesh

आमिरने का मागितली KGF 2 निर्मात्यांची माफी?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अभिनयाची चर्चा ही हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. त्याच्या चित्रपटांची त्याच्या चाहत्यांना नेहमीच प्रतीक्षा असते. सध्या आमिरचे चाहते त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता चाहत्यांना यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. कारण आमिरचा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार असून त्यासोबतच अभिनेता यशचा ‘केजीएफ २’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांची टक्कर पहायला मिळणार आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 'लाल सिंग चड्ढा' १४ एप्रिल रोजी रिलीज करण्याच्या निर्णयाबद्दल आमिरने 'KGF 2'चे निर्माते आणि अभिनेता यशची माफी मागितली आहे. नुकतंच आमिरने एका मुलाखतीत सांगितलं , "चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्समुळे रिलीजला उशीर होत आहे." त्यामुळे आमिरकडे दोनच पर्याय होते. पटकन काम उरकून चित्रपट लवकर प्रदर्शित करणं किंवा बारकाईने काम करून चित्रपट थोडा उशिरा प्रदर्शित करणं आणि आमिर हा मिस्टर परफेक्शनिस्ट असल्यामुळे त्याने दुसऱ्या पर्यायाची निवड केली आहे. म्हणून आमिरला 'KGF 2' रिलीज होत असलेल्या दिवशी 'लाल सिंह चड्ढा' रिलीज करावा लागत आहे.

हेही वाचा: आमिर तिसऱ्यांदा करणार लग्न? अखेर सत्य आलं समोर..

'लाल सिंग चड्ढा' आणि 'KGF 2' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे, यावरून त्याने 'KGF 2' च्या टीमची माफी मागितली. पुढे तो म्हणला, 'मी माझे चित्रपट इतर चित्रपटांच्या प्रदर्शनासह प्रदर्शित करत नाही. कारण मला दुसऱ्यांची जागा घ्यायची नाही. माझा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट शीख धर्मीयांवर बनलेला असल्याने त्याला बैसाखीच्या दिवसापेक्षा चांगली रिलीज डेट मिळू शकत नाही."

loading image
go to top