"इंडस्ट्रीमधला बॉयफ्रेंड नकोच"; मिनिषा लांबाने सांगितलं कारण

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिनिषाने तिच्या खासगी आयुष्याविषयी काही खुलासे केले.
Minissha Lamba
Minissha Lamba Instagram
Updated on

'बचना ए हसिनों', 'भेजा फ्राय २', 'हनिमून ट्रॅव्हल्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मिनिषा लांबा Minissha Lamba सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत मिनिषाने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. करिअरच्या सुरुवातीला मिनिषा एका अभिनेत्याला डेट करत होती. मात्र त्याच्या लहरी स्वभावामुळे तिने ब्रेकअप केला आणि पुन्हा कधीच इंडस्ट्रीतील व्यक्तीला डेट न करण्याचा निर्णय घेतला. मिनिषा सध्या रिलेशनशिपमध्ये असून तिच्या बॉयफ्रेंडविषयी तिने कोणतीच माहिती दिली नाही. याआधी तिने रेस्टॉरंट मालक रायन थामशी Ryan Tham लग्न केलं होतं. मात्र गेल्याच वर्षी या दोघांनी घटस्फोट घेतला. (this is why Minissha Lamba decided not to date anyone from the film industry)

रेडिओ शोवर सिद्धार्थ कननशी बोलताना मिनिषा म्हणाली, "ज्या अभिनेत्याला मी डेट करत होती, त्याने माझी फसवणूक केली. एकाच वेळी तो मला आणि दुसऱ्या मुलीलाही डेट करत होता. याच कारणामुळे मी इंडस्ट्रीमधील कोणासोबतच रिलेशनशिपमध्ये राहू इच्छित नाही. मला माहितीये की असे अनेकजण आहेत, जे अभिनेत्यांना डेट करत आहेत. त्यांच्या भावना मला दुखवायच्या नाहीत. पण मी हा निर्णय माझ्यासाठी घेतला आहे. कारण नातं म्हटलं की त्यात आधीच फार गुंतागुंत असते."

Minissha Lamba
'ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कापा'; नलू मावशीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Minissha Lamba
तेजश्रीने 'या' कारणामुळे सोडली 'अग्गंबाई सासूबाई' मालिका

घटस्फोटानंतर मिनिषा एका व्यक्तीला डेट करत असून ती व्यक्ती कोण आहे, हे सांगण्यास तिने नकार दिला. मिनिषाने 'हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड', 'बचना ए हसीनो', 'किडनॅप', 'वेल डन अब्बा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. ती 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वातही झळकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com