'या' मराठी अभिनेत्रीने स्थापन केली स्वत:ची निर्मिती संस्था | Marathi Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajaktta mali
'या' मराठी अभिनेत्रीची स्वत:ची 'निर्मिती संस्था'

'या' मराठी अभिनेत्रीची स्वत:ची 'निर्मिती संस्था'

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या सोनी वाहिनीवरील कॉमेडी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा यामध्ये सूत्रसंचालक करत आहे. नृत्यांगना, सूत्रसंचालक, कवयित्री अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृती प्रेक्षकांना दाखवल्या आहे. आता प्राजक्ताने स्वत:ची 'शिवोहऽम्' (Shiivoham Creations Private Limited) नावाची निर्मिती संस्था स्थापन केली आहे. आज (गुरुवार) तिने या संस्थेचे तिचे गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन देखील केलं आहे. सोशल मीडियावरून तिनं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व काही फोटो पोस्ट केले आहेत व म्हटलं आहे की,आज गुरूपुष्यामृत- गुरूवार आणि आजच्या मुहूर्तावर माझ्या गुरूंच्या (गुरू श्री श्री रविशंकरजी) शुभहस्ते माझ्या ‘निर्मिती संस्थेचं’ उद्दघाटन केलं आहे. त्रिवेणी आश्रम- पुणे इथे हजारोंच्या संख्येत जमलेल्या शिष्यांच्या भाऊगर्दीत मला त्यांना समक्ष भेटता आलं, त्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या.माझं #अहो भाग्य. हा योग साधता आला माझ्या आर्ट ॲाफ लिविंग च्या शिक्षकांमुळे.' अशी पोस्ट प्राजक्ताने केली आहे. ही पोस्ट करताच चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

काही दिवसापूर्वीं प्राजक्ताने 'प्राजक्तप्रभा' हा तिचा काव्यसंग्रह प्रसारित केलं होता. आता तिने मोठं पाऊल उचलत निर्मिती संस्था स्थापन केली आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससोबत नेहमी शेअर करत असते. उत्तम अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

loading image
go to top