esakal | 'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर वन मालिका
sakal

बोलून बातमी शोधा

marathi serials

TRP: 'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर वन मालिका

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ला Sukh Mhanje Nakki Kay Asta प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाने या मालिकेला महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनवलं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं असून गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर गौरीला नवा आत्मविश्वास मिळाला. जयदीपच्या मदतीने तिचं शिक्षणही पूर्ण होत आहे.

गौरीच्या मेकओव्हरमागे जयदीपचाही महत्त्वाचा वाटा आहे. गौरीने आपली मतं ठामपणे मांडावीत, शालिनीची अरेरावी सहन करु नये अशी जयदीपची इच्छा होती. त्यामुळे गौरीचा फक्त लूक नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वात देखिल परखडपणा येऊ लागला आहे. गौरीचं हे बदललेलं रुप प्रेक्षकांनाही आवडतं आहे. गौरीची भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूला तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन तिच्या नव्या लूकची प्रशंसा करत आहेत.

हेही वाचा: केवळ समंथा-नाग चैतन्यच नाही; नागार्जुन यांच्या कुटुंबातील घटस्फोटांचा इतिहास

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे पुढील भाग देखिल मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच माईंनी शालिनीला घराबाहेर काढलं. या अपमानाचा बदला शालिनी घेणार यात शंका नाही. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबावरच्या या संकटाचा सामना गौरी कसा करणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

loading image
go to top