Tiger 3: अखेर वाद मिटलाच! ९ वर्षांनी अरजित - सलमान एकत्र, टायगर 3 मधील पहिल्या गाण्याची घोषणा

टायगर 3 मधल्या अरजित सिंगने गायलेल्या पहिल्या गाण्याची घोषणा झालीय
tiger 3 first song leke prabhu ka naam by arijit singh salman khan katrina kaif released this diwali
tiger 3 first song leke prabhu ka naam by arijit singh salman khan katrina kaif released this diwaliSAKAL

सलमान खान - कतरिना कैफ यांच्या टायगर 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपुर्वी भेटीला आला. टायगर 3 च्या ट्रेलरला अल्पावधीत २५ मिलीयनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

आता टायगर 3 निमित्ताने एक अनोखी गोष्ट घडली आहे. ती म्हणजे टायगर 3 निमित्ताने गायक अरजित सिंग आणि सलमान खान ९ वर्षांनी एकत्र आलेत.

tiger 3 first song leke prabhu ka naam by arijit singh salman khan katrina kaif released this diwali
Jhimma 2: पुढच्या ट्रिपची तारीख ठरली, आनंदाची गाडी सुटली!, 'झिम्मा २' ची रिलीज डेट जाहीर

कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या "टायगर 3" या अत्यंत बहुचर्चित सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता सगळ्यांना चित्रपटाचे वेध लागले आहेत. कतरिनाने तिच्या सोशल मीडिया वर आगामी “लेके प्रभू का नाम” या गाण्याचं पोस्टर शेयर केलं आणि या पोस्टला कॅप्शन दिल “#Tiger3 Party track loading !

आमच्या पहिल्या गाण्याची पहिली झलक #LekePrabhuKaNaam हे गाणं 23 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशी पोस्ट शेअर करत कतरिनाने खुलासा केलाय.

टाइगर 3 च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. त्यामुळे निर्माते यश राज फिल्मस् 'लेके प्रभु का नाम' हे पहिलं गाणं लॉंच करण्याच्या तयारीत आहे. हे गाणं सोमवारी २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

हे गाणे अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांनी गायले आहे. यात कतरिना आणि सलमान खान यांचा डांस नंबर दिसणार आहे. याशिवाय सिनेमातील दुसरे गाणे जो एक रोमँटिक ट्रॅक आहे ते सुद्धा लवकरच फॅन्सच्या भेटीला येईल,

tiger 3 first song leke prabhu ka naam by arijit singh salman khan katrina kaif released this diwali
Veer Savarkar: "सावरकरांवरील टीकेला उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नाही तर.." दिग्दर्शक योगेश सोमण यांनी स्पष्टच सांगितलं

सलमान खानचा हा चित्रपट टायगर 3 स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ ही जबरदस्त अॅक्शन करताना चाहत्यांना दिसणार आहे.

यासोबतच यावेळी इम्रान हाश्मीने या चित्रपटात खलनायक म्हणून एंट्री घेतल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. टायगर 3 दिवाळीच्या मुहूर्तावर 12 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com