Tiger 3 : भाईजानचं ठरलं ईदच्याच दिवशी 'टायगर 3'ची धडक|Tiger 3 Salman khan Katrina kaif Yashraj films | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tiger 3

Tiger 3 : भाईजानचं ठरलं ईदच्याच दिवशी 'टायगर 3'ची धडक

Bollywood News: यशराज फिल्म्सनं आता मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सलमान खानच्या टायगर 3 ची रिलिज डेट जाहिर केली आहे. (tiger 3) प्रॉडक्शन टीमच्यावतीनं टायगरचा टीझर प्रदर्शित करुन प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. त्यामुळे सलमानच्या (Salman Khan) चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नेहमीप्रमाणे ईदच्या (Eid Released Date) दिवशी त्याचा आणि कतरिनाची मुख्य भूमिका असलेला टायगर 3 हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. 21 एप्रिल 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी यशराजनं शाहरुखच्या पठाणच्या (Shahrukh Khan Pathan Movie) रिलिज डेटची घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांनी सलमानच्या चित्रपटाची रिलिज डेट काय अशी विचारणा केली होती.

सोशल मीडियावर टायगर 3 चा टीझर व्हायरल करण्यात आला आहे. (Bollywood Actor) सलमान खाननं हा टीझर व्हायरल करताना चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. टायगर 3 हा हिंदी सोबत तमिळ, तेलुगू भाषेमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी आणि सलमान खान एका आंतरराष्ट्रीय अॅक्शन डायरेक्टर्ससोबत SRPF मैदानावर काही अॅक्शन सीक्वेन्स शूट करणार आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी इमरानने ट्विटरवर त्याचा एक हॉट अंदाजातला फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो चित्रपटाच्या पुढील शेड्यूलमध्ये सलमान खानशी सामना करण्यास तयार असल्याचे दिसून आले. आतापर्यंत इम्रानने या बद्दल बोलणे टाळले होते. अभिनेता खरोखरच या चित्रपटात पाकिस्तानच्या टायगरची भूमिका करणार असल्याचे समजले आहे.

हेही वाचा: Photo Viral: दिया मिर्झा पहिल्यांदाच दिसली छोट्या 'अव्यान' सोबत

टीझर बाबत बोलायचं झाल्यास त्याची सुरुवात कतरिनाच्या फायटिंग सीननं होते. त्यामुळे गेल्या भागाच्या तुलनेत यंदाचा भाग हा जास्त धमाकेदार असणार असल्याचे टीझरवरुन दिसून येते आहे. टायगरच्या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर सलमानच्या टायगर 3 चे वेध चाहत्यांना लागले होते. यापूर्वी सलमानचा राधे, अंतिम नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र ते बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. या अॅक्शन फ्रँचायझीमध्ये (Action Franchise) त्याचा टायगर ऑफ इंडियाशी जबरदस्त सामना होणार आहे. कतरिना कैफ देखील लवकरच 'टायगर 3' च्या सेटवर सामील होण्याची शक्यता आहे.

Web Title: Tiger 3 Release Date Announced Salman Khan Katrina Kaif Yashraj Films

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top