Tiger 3 Trailer Review : जे शाहरुख करतो तेच सलमानही करतोय, वेगळं काय आहे त्यात, 'टायगर ३' मध्ये नवीन काय असेल?

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या टायगर ३ चा ट्रेलर समोर आला असून त्याला नेहमीप्रमाणे जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
Tiger 3 Trailer Review Salman Khan Katrina Kaif
Tiger 3 Trailer Review Salman Khan Katrina Kaifesakal

Tiger 3 Trailer Review Salman Khan Katrina Kaif : बॉलीवूडमध्ये एखादा ट्रेंड सुरु झाला की, त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या वाढते. वर्षाच्या सुरुवातीला किंग खान शाहरुखचा पठाण आला होता. त्यात तो भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत होता. तो चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाचे कारण ठरला. त्यानं तब्बल हजार कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पुढील काही महिन्यात सनीचा गदर २ आला. तब्बल २१ वर्षांनी त्याचा दुसरा भाग आला होता.

सनीच्या गदर २ मध्ये त्यानं तारा सिंग या शिख व्यक्तीची भूमिका साकारली होती. जो पाकिस्तानात जाऊन आपल्या मुलाला पुन्हा भारतात घेऊन येतो. या चित्रपटानं देखील हजार कोटींची कमाई करुन आपल्या नावावर वेगळा विक्रम केल्याचे दिसून आले होते. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं या चित्रपटाची आगळी वेगळी पर्वणी प्रेक्षकांना दिली होती.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

या सगळ्यात शाहरुखचा जवान प्रदर्शित झाला. त्यात शाहरुख एका भारतीय लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. यावेळी त्यानं भारतातीलच एका बड्या उद्योगपतीशी पंगा घेतला होता. या शिवाय देशातील विविध समस्यांवर त्यानं वेगळ्या पद्धतीनं भाष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. ज्यामुळे तो चाहत्यांच्या कौतुकाचा विषय ठरला. येत्या काळात कंगनाचा तेजस, विकी कौशलचा सॅम बहादूर नावाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

Tiger 3 Trailer Review Salman Khan Katrina Kaif
Tiger 3 Trailer Out: ‘आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा…!’ टायगरचं नाव घ्यायचं नसतं..

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या टायगर ३ चा ट्रेलर समोर आला असून त्याला नेहमीप्रमाणे जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सलमानच्या चाहत्यांनी सलमानच्या या प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सलमाननं टायगर ३ मध्ये एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. ज्यानं आतापर्यत भारतासाठी विविध पराक्रमी आणि साहसी मोहिमा पार पाडल्या आहेत.

अविनाश सिंग राठोड या नावाची व्यक्तिरेखा सलमाननं साकारली आहे. त्याच्या पत्नी ही पाकिस्तानी गुप्तहेर आहे. त्यांनी लग्न केले असून त्यांना एक मुलगाही आहे. गेल्या काही वर्षांपासून अविनाशला भारतीय तपास यंत्रणांनी गद्दार म्हणून पाहिले आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे तो भलताच व्यथित झाला आहे. काही करुन त्याला आपण कोण आहोत हे दाखवून द्यायचे आहे. यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार आहे.

यावेळचा सलमान जास्तच आक्रमक आहे. तो आता देशासाठी नव्हे तर फॅमिलीसाठी लढताना दिसतो आहे. आपले काम थोडेसे पर्सनल आहे असे तो सांगून आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना मदतीचे आवाहन करतो आहे. असे साधारण कथेचे स्वरुप आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. तो पाहून नेटकऱ्यांना, चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tiger 3 Trailer Review Salman Khan Katrina Kaif
Shantit Kranti 2 Review: जगण्याचा आनंद घेऊन 'शांतीत क्रांती' करायला लावणारी अनोखी कहाणी

सलमान, शाहरुख यांच्या गेल्या काही चित्रपटांमधील गोष्टी पाहिल्यास त्यात देशभक्ती, रॉ आणि आयएसआय यांच्यातील संघर्ष, गुप्तहेर कारवाया, त्यानंतर त्याच चित्रपटांचा पुढील भाग प्रदर्शित करत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. वास्तविक त्या कथांमध्ये कोणत्याही प्रकारचे नाविन्य नाही. रंजकता, थरार, उत्कंठा यापैकी कोणतीही गोष्ट नाही. त्यामुळे केवळ साहसदृष्ये, संगीत, अॅक्शन स्टंट याच्या आधारे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Tiger 3 Trailer Review Salman Khan Katrina Kaif
Mission Raniganj Twitter Review: अशी शौर्यगाथा होणे नाही! अक्षय कुमारच्या सिनेमाने जिंकली मनं

टायगर ३ चे दिग्दर्शन मनिष शर्मा यांनी केले असून वायआरएफ स्पाय युनिव्हर्सची ही पाचवी फिल्म आहे. त्यात सलमान खान, कॅटरिना कैफ, इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि इम्रान हाश्मी पहिल्यांदाच एकत्रित काम करताना दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com