'हुक अप' गाण्यात रंगली आलिया आणि टायगरची केमिस्ट्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

स्टुडंट ऑफ द इयर - 2 हा चित्रपट शूटींग सुरु झाल्यापासूनच चित्रपटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे 'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

यु ट्यूबवर हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून तासाभरातच 5 लाखांवर लोकांनी गाणे बघितले आहे. 'मुंबई दिल्ली दी गुडीया' हे स्टुडंट ऑफ द इयर - 2 चे गाणे या पूर्वी प्रदर्शित झाले होते. आता 'हुक अप' गाण्याने तरुणाईला थिरकवले आहे. तारा सुतारीया आणि अनन्या पांडे यांची टायगर श्रॉफ सोबत मुख्य भूमिका आहे. आलिया भट ही केवळ 'हुक अप' गाण्यापुरतीच चित्रपटात दिसली असली तरी हे गाणे येण्याच्या आधीच सोशल मिडीयावर चर्चेत होते. 

आलिया आणि टायगर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत. गायक व संगीतकार विशाल व शेखर यांनी गाण्याला संगीत दिले आहे तसेच गायलेही आहे. तर नेहा कक्करनेही आलियासाठी या गाण्याला आवाज दिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger Shroff and Alia Bhatts Hook Up Song release of Student Of The Year 2