
Tiger Shroff Pune House: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफनं (Tiger Shroff) नुकतंच पुण्यात आलिशान घर घेतलं आहे. टायगरनं पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) या परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये नवं घर घेतलं आहे. हे घर टायगरनं भाड्यानं दिलं आहे. टायगरच्या या नव्या घराचं दर महिन्याचं भाडं किती आहे? जाणून घेऊयात...
टायगर श्रॉफने पुण्यातील हडपसर शहरात 7.5 कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे. हे घर हडपसरमधील प्रीमियम यू पुणे प्रोजेक्टचा भाग आहे. रिअल इस्टेट डेटाबेस प्लॅटफॉर्म Zapkey नुसार, टायगरनं 5 मार्च 2024 रोजी 52.5 लाख रुपये घराचं मुद्रांक शुल्क भरले आहे. तसेच हे घर त्यानं भाड्यानं दिलं आहे.
टायगरचे हे नवीन घर 4,248 स्क्वेअर फूटांचे आहे. या घराचं भाडं 3.5 लाख रुपये आहे. रिपोर्टनुसार, हे भाडे दर महिन्याला 5 टक्क्यांनी वाढवले जाणार आहे.
टायगर श्रॉफचे मुंबईतील खार येथे आठ-बीएचके अपार्टमेंट आहे. त्याची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे.
सिंघम अगेन, बड़े मियाँ छोटे मियाँ या चित्रपटांमधून टायगर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट 8 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत अक्षय कुमार, मानुषी छिल्लर सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच 15 ऑगस्ट रोजी सिंघम अगेन हा चित्रपट रिलीज होणार आहे. टायगरच्या या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.