
मुंबई - प्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा म्हणून परिचित न होता आपल्या अभिनयातून सर्वांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अशी टायगर श्रॉफची ओळख आहे. तो आपल्या जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. त्याचे नृत्यकौशल्य कमालीचे प्रभावी आहे. सोशल मीडियावर त्याच्या आगामी 'गणपथ' नावाच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. त्यासाठी त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे.
टायगर आता त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. टायगरने या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे. त्यात त्याचा अॅक्शन लूक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.”जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं”, असा डायलॉग टायगर म्हणताना दिसत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेला टायगर अनेकदा त्याच्या वर्कआऊट किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. टायगर लवकरच ‘गणपथ’ या चित्रपटात झळकणार आहे.
विकास बहल दिग्दर्शित ‘गणपथ’ या चित्रपटाचं चित्रीकण जून किंवा जुलै २०२१ मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या टायगरच्या नावावरचा पडदा जरी दूर झाला असला तरी त्याच्यासोबत अजून कोणते कलाकार आहेत याची माहिती समोर आली नाही.
आजवर टायगरचे अनेक अॅक्शनपट बॉक्सऑफीसवर हिट झाले आहेत. आपल्या चित्रपटांतील बहुतांशी स्टंट हे तो स्वत करतो अशी त्याची ओळख आहे. त्याच्या या नवीन लूकविषयी तो म्हणतो, मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे. या चित्रपटासाठी माझी, जॅकी भगनानी आणि विकास बहल यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली. मला चित्रपटाची कथा विशेष आवडली असून विकाससोबत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.