बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली,रडायला लागली! नेटकरी म्हणे, नाटकी नाहीतर...|Bigg Boss 16 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली,रडायला लागली! नेटकरी म्हणे, नाटकी नाहीतर...

Tina Dutta New Video : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये बिग बॉसनं वेगळी ओळख तयार केली आहे. यंदाचा बिग बॉस हिंदीचा सोळावा सीझन चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या या सीझननं नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना वेडं केलं आहे. त्यातील स्पर्धकांनी तर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अशातच एका स्पर्धकानं सोशल मीडियावरुन लक्ष वेधून घेतलेले आहे.

टीना दत्ता ही आता बिग बॉसमधून बाहेर पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अशातच तिनं सोशल मीडियावर जी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिग बॉसमध्ये टीनानं आपल्या स्पर्धकांविषयी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. दुसरीकडे टीनाची ती प्रतिक्रिया ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी तर टीनाला चांगलेच खडसावले आहे. तुला तर आता बाहेर पडल्यानंतर एवढी टीका करायची असेल तर तू चुकीचे काम करते आहेस. हे लक्षात ठेव. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Also Read - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

काही मीडियानं टीनाशी संपर्क साधल्यानंतर तिनं बिग बॉसमध्ये आपल्यासोबत जो प्रकार घडला त्याबाबत सांगितले आहे. ग्रँड फिनालेसाठी अवघ्या बारा दिवसांचा कालावधी शिल्लक असून चार महिन्यांपासून सुरु असणाऱ्या यंदाच्या सीझनचा विजेता कोण होणार, याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. आता बिग बॉसच्या घरात ७ स्पर्धक उरले आहेत. गेल्या आठवड्यात टीना दत्ताला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

टीनाचे म्हणणे आहे की, आता मला बरे वाटते आहे. मी फायनली त्या घरातून बाहेर आली आहे. पण असं असलं तरी, मी माझ्या बाकीच्या मित्रांना खूप मिस करते आहे. मला त्यांची आठवण येते आहे. खासकरुन प्रियंका आणि अर्चना यांना तर मी केव्हा भेटेन असे झाले आहे. टीनाला त्या व्हिडिओवरुन अनेकांनी ट्रोल केले आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, नाटकी नाहीतर, आता सगळयांची आठवण काढून रडते आहे. त्याचा काय उपयोग..