'मला प्रसिध्द व्हायचं नव्हतं, ब्रिटिश पत्रकार माझ्याशी क्रुरपणानं वागले'

titanic actress kate winslet not ready for fame being bullied was horrible experience
titanic actress kate winslet not ready for fame being bullied was horrible experience

मुंबई - चित्रपट विश्वाविषयी बोलताना त्या विश्वातील सार्वकालिक कलाकृती यांच्याविषयी बोलायचे झाल्यास काही निवडक कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल. तुम्हाला टायटॅनिक आठवतोय. वास्तव घटनांवर आधारित या चित्रपटाला पाच पेक्षा अधिक ऑस्कर मिळाले होते. आजही अनेकांच्या सर्वाधिक आवडीचा चित्रपट म्हणून टायटॅनिक आहे. जगातील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती.

टायटॅनिकमध्ये रोझची भूमिका करणा-या केट विन्स्लेटने  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने सांगितले आहे की, या चित्रपटानं मला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सगळीकडे माझे नाव झाले होते. भारतातही टायटॅनिकनी कोटयवधीचा व्यवसाय केला होता. मात्र यासगळ्यात केटनं आपल्याला मिळालेली एवढ्या प्रसिध्दीबाबत खंत व्यक्त केली आहे. ती म्हणाली मला एवढ्या प्रमाणात मिळालेल्या प्रसिध्दीची अजिबातच अपेक्षा नव्हती. हे खरे आहे की टायटॅनिकमुळे मला एक नवी ओळख मिळाली. पण ती नको होती. याचे कारण म्हणजे मला त्याचा झालेला त्रास. अनेकदा प्रमाणापेक्षा मिळालेली प्रसिध्दीही नकोशी होते. त्याचे हे एक उत्तम उदाहरण सांगता येईल.

केट आणि लिओनार्दो कॅप्रिओची जोडी लोकप्रिय झाली होती. अजूनही त्यांचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. केटनं एका पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, टायटॅनिकनंतर मी स्वतामध्ये जास्त गुंतत गेले. सेल्फ प्रोटेक्टिव्ह झाले. माझी रात्र आणि दिवस हे दोन्ही सारखेच होते. जास्त संशयी होत चालले होते. त्यानंतर माझ्यावर खूप टीकाही झाली. यासगळ्याचे कारण ब्रिटिश प्रेसनं माझ्यासोबत केलेला व्यवहार हे होते. मला असे वाटत होते की दरवेळी विनाकारण मला लक्ष्य केले जात आहे. तो माझ्यासाठी फारच भयानक अनुभव होता. तो काळ कधी संपेल असे मला झाले होते. जगासाठी जरी मी फार प्रसिध्द अभिनेत्री असेल प्रत्यक्षात माझ्यावर काय प्रसंग ओढावले होते हे सांगूनही खरे वाटणार नाही.

मला अपयशी व्हायचे नव्हते. मला पुन्हा चांगल्या पध्दतीनं कम बॅक करायचे होते. आणि त्या खेळात मला दीर्घकाळ टिकावही धरायचा होता. त्यामुळे हार मानून चालणार नव्हते. दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. मला माझं खासगीपणही जपायचे होते. त्यामुळे मी अधिक सावध झाले आणि कामाला सुरुवात केली असेही केटनं यावेळी सांगितले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com