तितिक्षा तावडे (रॅपिड फायर) 

चिन्मयी खरे  
गुरुवार, 22 जून 2017

"सरस्वती' मालिकेतील लाडकी सरू सध्या मोठ्या मालकांच्या परतण्याने खूपच खूश आहे. या मालिकेच्या निमित्ताने आपली लाडकी सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे हिच्यासोबत रंगलेलं हे रॅपिड फायर.. 

तुझा आवडता सहकलाकार कोण? 
- सुलेखा तळवलकर. 

"सरस्वती' मालिकेतील लाडकी सरू सध्या मोठ्या मालकांच्या परतण्याने खूपच खूश आहे. या मालिकेच्या निमित्ताने आपली लाडकी सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे हिच्यासोबत रंगलेलं हे रॅपिड फायर.. 

तुझा आवडता सहकलाकार कोण? 
- सुलेखा तळवलकर. 

अभिनेत्री का व्हावंसं वाटलं? 
- माझी बहीण खुशबू तावडे ही अभिनेत्री आहे. तिच्याकडे पाहूनच मला अभिनेत्री व्हावंस वाटलं. 

एखादी आवडती भूमिका जी तुला करावीशी वाटते? 
- "क्वीन' चित्रपटातील राणीची भूमिका. 

कोणाबरोबर काम करायला आवडेल? 
- नाना पाटेकर. 

अभिनेत्री झाली नसतीस तर? 
- हॉटेलियर झाले असते. 

 तुझा आवडता रंग कोणता? 
- निळा. 

तुझा आदर्श कोण आहे? 
- कंगना रानौत. 

सरस्वती आणि तितिक्षामध्ये काय साम्य आहे? 
- दोघीही स्वाभिमानी आहे, दोघींनाही लगेच रडू येतं आणि दोघीही खूप फ्रेंडली आहेत. 

आस्ताद काळेकडून काय शिकलीस? 
- त्याचं पाठांतर चोख असतं, त्याने नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याच्यासारखा अभिनयातला चोखपणा आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करतेय. 

तू क्रिकेट खेळायचीस तर तुझा आवडता क्रिकेटपटू कोण? 
- महेंद्रसिंग धोनी. 

 

Web Title: titiksha tawade marathi actress interview