esakal | 'तारक मेहता..'मधील बबिताचा समुद्रकिनारी मड बाथ; चाहते म्हणाले..
sakal

बोलून बातमी शोधा

munmun dutta

'तारक मेहता..'मधील बबिताचा समुद्रकिनारी मड बाथ; चाहते म्हणाले..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत बबिताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता Munmun Dutta सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती जॉर्डन येथे मड बाथ घेताना दिसत आहेत. मोनॉकिनीमध्ये संपूर्ण अंगाला आणि चेहऱ्याला माती थापतानाचे हे थ्रो-बॅक फोटो मुनमुनने शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. (TMKOC Star babita aka Munmun Dutta Stuns Fans As She Takes Mud Bath slv92)

पहिल्या फोटोमध्ये मुनमुन अंगाला माती लावताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती मृत समुद्राकडे जाताना दिसत आहे. यानंतर तिने दोन्ही हात पसरून समुद्राचा आनंद घेत असल्याचा तिसरा फोटो पोस्ट केला आहे. २०१७ मध्ये मुनमुन जॉर्डनला फिरायला गेली होती. तेव्हाचे हे फोटो आहेत. 'मृत सागर आणि मड बाथ', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. याआधीही मुनमुनने तिच्या भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मड थेरेपी म्हणजे काय?

मड थेरेपी ही अत्यंत जुनी आणि पारंपरिक थेरेपी आहे. या थेरेपीचे त्वचेला अनेक फायदे आहेत. शरीरावर मातीचा लेप लावण्यालाच मड थेरेपी म्हणतात. नॅच्युरोपथीमध्ये मातीचा लेप लावून अनेक रोगांवर उपचार केले जातात. ही माती पूर्णपणे केमिकल फ्री आणि स्वच्छ असते. मड थेरेपीसाठी जमिनीच्या जवळपास चार-पाच फूट खालून माती काढली जाते. या थेरेपीमुळे त्वचेशी संबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्वचेतील ओलावा टिकून ठेवून तजेलदारपणा आणण्यात मदत होते.

loading image