esakal | Tokyo Olympics: ए.आर.रेहमानचं 'हिंदूस्थानी वे' व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

hindustani way

Tokyo Olympics: ए.आर.रेहमानचं 'हिंदूस्थानी वे' व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टीम इंडिया (team india) आता ऑलम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करण्यास तयार झाली आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चिअर्स साँग तयार करण्यात आले आहे. त्या गाण्याला ऑस्करविजेते गायक ए आर रेहमान (oscar winner a r rehman) यांनी संगीत दिलं आहे. हे गाणं आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. हिंदूस्थानी वे असे त्या गाण्याचे नाव आहे. 23 जुलैपासून त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांशी संवाद साधला होता. (tokyo olympics theme song hindustani way a r rahman ananya birla dedicated to indian players yst88)

अनन्या (ananya birla) ही भारतीय गायिका आहे. जिनं इंटरनॅशनल पातळीवर लोकप्रियता मिळवली आहे. ती प्रसिद्ध बिझनेसमन कुमार मंगलम बिर्ला (kumar mangalam birla) यांची मुलगी आहे. या गाण्याविषयी तिनं लिहिलं आहे की, टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय स्पर्धकांसाठी गाणं तयार करणं ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. या निमित्तानं त्यांचा उत्साह वाढविण्याची संधी आपल्याला मिळते आहे. ही विशेष बाब म्हणता येईल. हे गाणं लिहिणं आणि ते गाणं अभिमानास्पद आहे.

23 जुलै पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धा 8 ऑगस्टपर्यत चालणार आहेत. या स्पर्धेसाठी थीम साँग तयार करण्याचे काम ऑस्कर विजेते ए आर रेहमान यांनी केले आहे. त्यांनी या प्रोजेक्टवर काम कऱण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगितले आहे. हे माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. ए आर रहमान यांनी हिंदूस्थानी वे नावाचे गाणे तयार केले आहे. हे गाणे अनन्या बिर्लानं निरमिका सिंग आणि शिशिर सामंत यांनी मिळून लिहिलं आहे. अनन्यानं काही इंग्रजी गाणी ही लिहिली आहेत.

हेही वाचा: 'ती माझी ऑफिशियल पार्टनर' केएल राहुलचे 'रिलेशनशिप' स्टेट्स

2020 मध्ये टोकियो ऑलम्पिक होणार होते. मात्र त्यावेळी कोरोनानं सगळ्या नियोजनावर पाणी फेरले. त्याचा परिणाम या स्पर्धेच्या आयोजनावर झाला. जेवढी तयारी केली होती ती वाया गेली. आता पुन्हा नव्यानं सगळी तयारी करण्यात आली आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात आली आहे. आरोग्याचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये म्हणून कुठलाही धोका पत्करला जाणार नसल्याचेही नियोजन समितीकडून सांगण्यात आले आहे.

loading image