Dhanush: 'रिक्षावाला आला हिरो व्हायला!' धनुषला रडू आवरेना...|Tollywood Actor Dhanush Reveals body shaming | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor dhanush

Dhanush: 'रिक्षावाला आला हिरो व्हायला!' धनुषला रडू आवरेना...

Dhanush On Body Shaming: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये ज्या अभिनेत्याचे नाव सुपरस्टार म्हणून घेतले जाते त्या धनुषचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यानं एका मुलाखतीमध्ये आपल्याला लोकांनी कशाप्रकारे ट्रोल केले हे सांगितले आहे. (tollywood news) धनुषला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. त्याच्या असुरन, अथिरन या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले (bollywood news) होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी धनुष हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. टॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा जावई (tollywood superstar rajnikanth) असणाऱ्या धनुषच्या घटस्फोटानं वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले होते.

साऊथ सुपरस्टार धनुषनं एका मुलाखतीमध्ये आपल्याला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला असे सांगितले. काही वेळा मला माझ्या दिसण्यावरुन लोकांनी खूप नावं ठेवली असं त्यानं सांगितलं आहे. मला चांगलं आठवतंय शुटींगचा पहिलाच दिवस होता. मी सेटवर गेल्यानंतर तिथे मला काही लोकांनी आता रिक्षावाला हिरो होणार. अशा शब्दांत माझा अपमान केला होता. सेटवरुन घरी आल्यानंतर मी खूप रडलो होतो. मात्र काहीही झालं तरी आपण हिरो होऊन दाखवायचं असा पण केला. आणि यशस्वी होऊन दाखवलं. अशी आठवण धनुषनं त्या मुलाखतीमध्ये सांगितली.

धनुष हा केवळ अभिनेता नाही तर तो चांगला गायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरणाऱ्या धनुषला नेहमीच नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यानं रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा त्याच्यावर खूप टीका झाली. त्याचे नाव टॉलीवूडमधल्याच कमल हासन यांच्या मुलीशी जोडले जाऊ लागले होते. धनुषनं त्याचे वडील कस्तुरी राजा यांच्यासोबत थुल्लुवधो इलमई नावाच्या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

2015 मध्ये विजय सेतपती सोबत झालेल्या एका मुलाखतीमध्ये धनुषनं त्याच्या आयुष्यातील त्या कटू आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला मी जेव्हा 2003 मध्ये आलेल्या कादल कोंडनच्या शुटींगमध्ये होतो तेव्हा हिरो कोण आहे असे मला विचारण्यात आले होते. काही कलाकारांनी माझ्याकडे इशारा केला. मात्र त्यावेळी सेटवर असणाऱ्यांनी माझी टिंगल केली. हा असा हिरो असतो का... अशी विचारणा त्यांनी केली होती.

हेही वाचा: Salman Khan: 'अरे कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? मी नाही ओळखत!'

Web Title: Tollywood Actor Dhanush Reveals Body Shaming Incident Interview Film Set

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..